मुंबई, 16 जुलै : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी (Heavy rain) लावल्याचं पहायला मिळत आहे. पहाटेपासूनच मुंबई शहर (Mumbai City), मुंबई उपनगरासह ठाणे (Thane), कल्याण डोंबिवली, नवी मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसेच रस्त्यांवर सुद्धा पाणीच पाणी पहायला मिळत आहे. मुंबईत चेंबूर, कुर्ला, नेहरू नगर, सायन, वडाळा, वांद्रे, सांताक्रुझ परिसरात रस्त्यांवर पाणी आल्याचं दिसून येत आहे. अशीच परिस्थिती ठाणे, नवी मुंबईतील सखल भागांत निर्माण झाली आहे. पावसाचा हा जोर अद्यापही कमी होत नाहीये तसेच दिवसभर हा पाऊस अशाच प्रकारे बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
#WATCH | Mumbai: Water-logging at Mumbai's Gandhi Market area as the city continues to receive heavy rainfall pic.twitter.com/1I6tKRUDUV
— ANI (@ANI) July 16, 2021
पुढील 3 तासांत मुसळधार हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन तासांत मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
#WATCH | Maharashtra: Parts of Mumbai face waterlogging, following heavy rainfall this morning. Visuals from Wadala
— ANI (@ANI) July 16, 2021
Regional Meteorological Centre, Mumbai predicts "light to moderate rain in city & suburbs with possibility of heavy rainfall at isolated places" for next 24 hours. pic.twitter.com/wPgOZUukms
राज्यासाठी दिलासादायक बातमी, अर्धा महाराष्ट्र कोरोनातून लवकरच मुक्त पण…, कोकणात अतिवृष्टीचा इशारा कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तिन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यात पहाटे पासून पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. रात्री पावसाने उसंत दिल्याने राजापूर कोदवली नदीला आलेला पूर ओसरला होता. त्यामुळे राजापुर बाजार पेठेचा धोका टळला होता. जिल्ह्यातील सर्वच नद्या पूर्वपदावर वाहत होत्या परंतु पहाटे पासून कोसळणार्या पावसामुळे पुन्हा आज दिवसभरात परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. हवामान विभागाने 16 जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे आज संपूर्ण कोकणात पाऊस असण्याची शक्यता आहे. काही भागात मुसळधार तर काही भागात अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.