मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune News: शाही लग्न सुरू होण्याआधीच पोलिसांची धाड! 1 लाख 14 हजारांचा दंड भरताना आले नाकीनऊ

Pune News: शाही लग्न सुरू होण्याआधीच पोलिसांची धाड! 1 लाख 14 हजारांचा दंड भरताना आले नाकीनऊ

कोरोनासाठीचे ठरलेले नियम (Corona Protocols) धुडकावून शाही लग्न करणे चांगलेच महागात पडले आहे. सुखेजा तसेच पारस्वानी या दोन कुटुंबीयांना शाही विवाह सोहळा आयोजित करणं महागात पडलं आहे

कोरोनासाठीचे ठरलेले नियम (Corona Protocols) धुडकावून शाही लग्न करणे चांगलेच महागात पडले आहे. सुखेजा तसेच पारस्वानी या दोन कुटुंबीयांना शाही विवाह सोहळा आयोजित करणं महागात पडलं आहे

कोरोनासाठीचे ठरलेले नियम (Corona Protocols) धुडकावून शाही लग्न करणे चांगलेच महागात पडले आहे. सुखेजा तसेच पारस्वानी या दोन कुटुंबीयांना शाही विवाह सोहळा आयोजित करणं महागात पडलं आहे

आनिस शेख, पुणे, ०1 मे : कोरोनासाठीचे ठरलेले नियम (Corona Protocols) धुडकावून शाही लग्न करणं एका कुटुंबाला चांगलंच महागात पडले आहे. सुखेजा तसेच पारस्वानी या दोन कुटुंबीयांच्या शाही विवाह सोहळ्याची तयारी हॉटेलमध्ये सुरू असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं, त्यानुसार लग्नात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी पोलिसांनी तत्काळ कारवाईचा बडगा उचलला.

लोणावळा याठिकाणी असणाऱ्या ग्रँड विसावा या आलिशान हॉटेलमध्ये शाही थाटात तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत लग्न सोहळा थाटामाटात पार पडणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावत यांना मिळाली. सायंकाळच्या सुमारास पार पडणाऱ्या या लग्नसोहळ्यात 25 पेक्षा जास्त वऱ्हाडी मंडळी मुंबई, उल्हासनगर येथून लोणावळ्यात (Lonavala pune) दाखल झाली असल्याबाबतची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस अधिकारी नवनीत कावत यांनी तत्काळ पोलीस पथक तयार करून हॉटेल ग्रँड विसावा या ठिकाणी पाहणी केली आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याने कारवाई केली.

हॉटेल चालक हेमंत मखिजा (राहणार उल्हासनगर ठाणे) यांच्यावर शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 तसेच कलम 269 नुसार कारवाई करत 50 हजार रुपयांचा दंड पोलिसांकडून ठोठाविण्यात आला. तसेच हॉटेलमधील 38 खोल्या बुक करून लग्न सोहळ्यासाठी जमलेल्या 76 वऱ्हाडी मंडळीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन न केल्याप्रकरणी 14 हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केली. तसंच कोविड काळ संपेपर्यंत संबंधित हॉटेल बंद करण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आधीकांऱ्यानी दिली आहे.

हे वाचा - गर्दी टाळण्यासाठी अमरावती पॅटर्न ठरतोय हिट! डब्ब्यात चिट्ठी टाकून घरी जा, असं होईल Vaccination

संबंधित विवाह सोहळ्याची माहिती लोणावळा नगरपरिषदेच्या आरोग्य विभगाच्या पथकाला मिळाली असता त्यांनी देखील कोविड  कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 50 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई हॉटेल चालकावर केली. स्थानिक पोलीस तसेच लोणावळा नगरपरिषद यांच्याकडून हॉटेल ग्रँड विसावा चालक तसेच लग्नातील दोन्ही कुटुंबीयांकडून एकूण 1 लाख 14 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

हे वाचा - अजबच! ऑक्सिजनसाठी पिंपळाच्या झाडाखाली झोपले रुग्ण, प्रकृती स्थिर असल्याचा दावा

सुखेजा तसेच परस्वानी या दोन कुटुंबीयांच्या लग्न समारंभाला 25 जवळच्या नातेवाईकांनीच उपस्थित राहावे, तसेच बाकीच्या वऱ्हाडी मंडळींनी थेट आपले घर गाठावे अशा सक्त सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या

जवळच्या व्यक्तीचा मृत्यू , गंभीर आजार आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुठल्याही कारणास्तव महामार्गावर प्रवासाची शासनाकडून परवानगी नसताना उल्हासनगर ठाणे येथून लोणावळ्यात मोठ्या संख्येने वऱ्हाडी मंडळी पोहोचले तरी कसे? त्यांच्याकडे ई पास उपलब्ध आहे की नाही? अशा सर्व बाबींची चौकशी करून पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदाराने लोणावळा पोलिसांकडे केली आहे.

First published:
top videos

    Tags: Corona updates, Coronavirus, Pune, Pune news