मराठी बातम्या /बातम्या /पुणे /किरकोळ वादातून महिलेने बस चालकाचं डोकं फोडलं; भाजपची माजी नगरसेवक असल्याचा दावा

किरकोळ वादातून महिलेने बस चालकाचं डोकं फोडलं; भाजपची माजी नगरसेवक असल्याचा दावा

किरकोळ वादातून महिलेने बस चालकाचं डोकं फोडलं

किरकोळ वादातून महिलेने बस चालकाचं डोकं फोडलं

पुणे शहरात किरकोळ वादातून महिलेची बस चालकाला डोकं फुटेपर्यंत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

पुणे, 15 मार्च : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी वाढली असल्याचं आकडेवारीवरुन दिसत आहे. पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कोयता गंगचा बंदोबस्त केला आहे. मात्र, आता सामान्य नागरीकही कायदा हातात घेत आहेत. अशीच एक घटना पुण्यात समोर आली आहे. किरकोळ वादातून एका महिलेने पीएमपीएल बस चालकाला मारहाण केली आहे. महिला माजी भाजप नगरसेवक असल्याचा दावा या बस चालकाने केला आहे. पुण्यातील अभिनव चौकात दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी स्वारगेट डेपोतील पीएमपीएल बसचे चालक शशांक देशमाने यांचा मार्ग क्र 2 वरती सकाळ कर्तव्यावर असताना अभिनव कॉलेज चौकात बस व कारचा किरकोळ अपघात झाला. यावरुन कारचालक महिला आणि चालक यांच्यामध्ये वाद झाला. त्या वादातून महिलेने इतर 3 साथीदारांसह चालक देशमाने यांना जबर मारहाण केली. यात चालकाचं डोकं फुटून रक्त वाहू लागलं. आरोपी महिला भाजपची माजी नगरसेवक असल्याचा दावा बसचालकाने केला आहे.

वाचा - नवऱ्यासमोरच महिला प्रवाशासोबत....; धावत्या ट्रेनमध्ये टीसीचं लज्जास्पद कृत्य

अपघात झालेल्या चार चाकी गाडीचा चालक आणि कारमधील इतर व्यक्ती हे भाजपचे माजी नगरसेवक असल्याचा असा दावा देशमाने यांनी केला आहे. जखमी चालकाला ससून हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची पूर्ण माहिती पीएमपीएल सीएमजी ओमप्रकाश बकोरिया यांना समजल्यानंतर त्यांनी स्वतः पुणे पोलीस कमिशनर यांच्याशी फोनद्वारे संवाद साधून दोषींनाविरोधत कडक कारवाई करून गुन्हा नोंद करण्यास सांगितला आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

First published:

Tags: PMPML, Pune