पुणे 22 फेब्रुवारी : पुण्यातील (Pune) खराडी बायपास चौकात पीएमपीएल (PMPL) बसनं अचानक पेट (Bus Fire) घेतल्याची घटना घडली आहे. धावत्या पीएमपीएल बसनं अचानक घेतलेल्या या पेटामुळे एक प्रवाशी जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. अग्निशमन दल तसंच विमाननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
खराडी बायपास चौकात धावत्या PMPL बसला आग pic.twitter.com/UTG73qU67h
— News18Lokmat (@News18lokmat) February 22, 2021
धावत्या पीएमपीएल बसने अचानक पेट घेतल्यामुळे लागलेल्या आगीत एक प्रवाशी जखमी झाल्याची घटना खराडी बायपास चौकात घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि विमानतळ पोलिसांनी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुणे - नगर रोडवर पीएमपीएमएल बसला आग लागली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीनं धडक दिल्यानंतर बसला आग लागली आहे. ही आग इतकी भयंकर होती, की यात CNG बस जळून पूर्णपणे खाक झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fire