जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune News: नाशिक घटनेनंतर पुणे मनपा खडबडून जागी; खासगी रुग्णालयांसाठी नवा आदेश

Pune News: नाशिक घटनेनंतर पुणे मनपा खडबडून जागी; खासगी रुग्णालयांसाठी नवा आदेश

Pune News: नाशिक घटनेनंतर पुणे मनपा खडबडून जागी; खासगी रुग्णालयांसाठी नवा आदेश

पुण्यात महानगर पालिकेनं (Pune Municipal Coroporation) सर्व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनशी (Oxygen supply at private hospital) संबंधित सुविधांचं ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 22 एप्रिल : नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर (Oxygen leakage at nashik hospital) आता संपूर्ण राज्यातील आरोग्य यंत्रणा जणू खडबडून जागी झाली आहे. विविध ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा किंवा इतर आरोग्य व्यवस्था कशी आहे याचा आढावा घेतला जात आहे. अनेक ठिकाणी लहानमोठ्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पुण्यातही महानगर पालिकेनं (Pune Municipal Coroporation) सर्व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनशी (Oxygen supply at private hospital) संबंधित सुविधांचं ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अनेक खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून परवानगी देत कोरोना रुगणांवर उपचार सुरू आहेत. अनेक खासगी हॉस्पिटल पूर्णपणे तर काही ठिकाणी ठरावीक बेड हे कोविड रुग्णांवर उपचारासाठी राखीव आहेत. (वाचा- Coronavirus 2nd Wave: असा मास्क लावाल तरच होईल फायदा; कुठला मास्क वापरायचा? ) जवळपास हे सर्वच बेड भरलेले असल्याचं चित्र आहे. त्यामुळं खासगी हॉस्पिटमध्ये मोठ्या प्रमणावर रुग्ण आहेत. अशा परिस्थितीमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये दुर्घटना होऊ नये यासाठी मनपानं आता आढावा घ्यायला सुरुवात केली आहे.

जाहिरात

नाशिक येथील दुर्घटनेनंतर विशेषतः या हॉस्पिटलमध्ये असलेल्या ऑक्सिजनच्या व्यवस्थेबाबत माहिती घेतली जात आहे. त्वरित अहवाल सादर करा! पुणे महानगर पालिकेच्या वतीने त्यांच्या हद्दीतील सर्वच खासगी रुग्णालयांना त्यांची ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा, ऑक्सिजन साठवण्याची यंत्रणा आणि इतर संबंधित बाबींचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. (वाचा- Corona Vaccination: लसीकरणासाठी घरबसल्या करा रजिस्ट्रेशन, जाणून घ्या सोपी पद्धत ) याबाबतची माहिती घेऊन त्वरित त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशही महानगर पालिकेनं दिले आहेत. कोरानाच्या संकटाशी दोन हात करताना दुसरं अनामिक संकट टाळण्यासाठी पुणे मनपानं हे पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये कोविडच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती झाल्यानं घडलेल्या दुर्घटनेत 22 रुग्णांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळं राज्याभरात आता संबंधित यंत्रणांनी हॉस्पिटलमध्ये यासंदर्भात माहिती घ्यायला किंवा ऑडिट करायला सुरुवात केली आहे. पण हेच काम ही दुर्घटना घडण्यापूर्वी केलं असतं तर कदाचित हे 22 जण आजही उपचार घेत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात