Home /News /pune /

Modi Temple in Pune: आता पुण्यातही मोदी भक्ताने उभारले चक्क मोदी मंदिर!

Modi Temple in Pune: आता पुण्यातही मोदी भक्ताने उभारले चक्क मोदी मंदिर!

औंध भागातील मयुर मुंढे या भाजपा कार्यकर्त्याने मोदींचे छोटेखानी मंदिर उभारलं आहे.

पुणे, 17 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) भक्त त्यांना काय उपमा देतील याचा नेम नाही,  पुण्यात तर अशाच एका मोदी भक्ताने पंतप्रधान मोदींना चक्क देवाचा दर्जा देऊन त्यांचे मंदिरच (Modi Temple) उभारले आहे. अर्थात यामध्ये मोदी भक्तांना काही आश्चर्य वाटत नसले, तरी सर्वसामान्य लोकांसाठी मोदींचे मंदिर हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वी आपण अनेकदा मोदी भक्त हा शब्द ऐकला आहे. मात्र, त्यामुळे पुण्यामध्ये एका मोदीभक्ताने यालाच साजेशी कृती केली आहे. पंतप्रधान मोदींना देवाच्या रूपात मानून त्यांचे मंदिर उभारले आहे. पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे (Mayur Mundhe) या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूरमधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला आहे. याकरिता 1 लाख 60 हजार रुपये खर्च आलेला आहे. 15 ऑगस्ट 2021 दिवशी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. "बैलगाडा शर्यतीसाठी शेतकरी येणार, अफगाणिस्तानवरुन तालिबान नाही" मंदिरासमोर मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता मोदी भक्तांकरिता लावण्यात आली आहे. मंदिराबाहेर असलेल्या, फलकावर आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख देखील या कवितेच्या आधारे मांडण्यात आली आहे. या मंदिरावरून मला विरोधकांनी ट्रोल केलं गेलं तरी चालेल, पण मोदींकडून आपल्याला प्रेरणा मिळते. त्याकरिता हे मंदीर उभारले असल्याचे मयूर मुंढेनी यावेळी सांगितले आहे. आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख त्यांनी त्याच्या कवितेच्या आधारे ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खरंतर मोदींना उपमा देण्यासाठी भक्तांची दररोज नवनवी कसरत चालू असते. काही दिवसांपूर्वी भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनीही मोदीस्तुती करणारे एक ट्विट केले होते.  ट्विटमध्ये तयांनी म्हटलं होतं की नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11 वे अवतार आहेत. ते देवासमान आहेत. ते देशाची सेवा करत आहे. या विषयावर विरोधकांनी टीका टिप्पणी केली होती. त्यांनतर आता तर थेट मोदींचे मंदिर उभारले गेले आहे त्यामुळे आता चर्चा तर होणारच.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Narendra modi, Pune

पुढील बातम्या