Home /News /pune /

पुण्यावरचं मोठं संकट पोलिसांमुळे टळलं, लॉकडाऊनमध्येही या राज्यात जाऊन उधळला कट

पुण्यावरचं मोठं संकट पोलिसांमुळे टळलं, लॉकडाऊनमध्येही या राज्यात जाऊन उधळला कट

पुणे शहरातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्यामुळे पोलिसांचे या कारवाईनंतर सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड, 16 जुलै : परपराज्यातून बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी आणला जाणारा मोठा शस्त्रसाठा पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केला आहे. गुन्हे शाखा युनिट ४ ने केलेल्या या कारवाईत देशी विदेशी बनावटीचे तब्बल 42 पिस्तुलं, 66 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. तर अशा घातक शस्त्रांचा राज्यात पुरवठा करणाऱ्या टोळीतील 15 जणांनाही पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात पिंपरी चिंचवडमधील सांगवी इथल्या एका इसमाला अवैध हत्यार बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या तपासात पोलिसांना आणखी धक्कादायक माहिती समोर आली की, अशात प्रकारचं मोठं रॅकेट शहरात सक्रिय आहे, जे मध्यप्रदेशमधून बनावटी पिस्तुलं महाराष्ट्रात तसंच पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणलं जातं. पोलिसांनी याचे गांभीर्य पाहता तत्काळ काही पथकं तयार केली. यावेळी तपासादरम्यान पोलिसांचे एक पथक मध्यप्रदेशमध्ये जाऊन काही दिवस तिथे वेषांतर करून राहिले आणि आरोपींची संपूर्ण माहिती घेतली. या काळात लॉकडाऊन लागू झाल्यानं पोलिसांना मोठी अडचणदेखील निर्माण झाली होती. परंतु तरीदेखील वेषांतर करून पोलीस तिथेच तळ ठोकून बसले आणि मिळालेल्या माहिती नुसार पोलिसांना मुख्य आरोपीला मध्यप्रदेशमधून अटक केली. या बँकांनी बदलले मिनिमम बॅलन्स-व्यवहारासंदर्भातील नियम, 1 ऑगस्टपासून लागू होणार पुढील तपासात पुणे व आसपासच्या भागातून पोलिसांनी इतर आरोपीना अटक केली असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त झाल्यामुळे मोठा घातला प्लान शिजत असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. धक्कादायक! महाराष्ट्राच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांचा कोरोना, पुण्याला हलवलं मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एकूण 26 आरोपी समोर आले असून सध्या पोलिसांनी एकूण 15 आरोपींना अटक केली आहे तर अन्य 11 आरोपींच्या मागावर आपले पोलीस असल्याचंही बिष्णोई म्हणाले. यामुळे पुणे शहरातही भीतीचं वातावरण आहे. कुठलीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास पोलिसांना संपर्क साधावा अशा सूचना संबंधित परिसरात नागरिकांना देण्यात आल्या आहेत. पुणे शहरातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्यामुळे पोलिसांचे या कारवाईनंतर सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. संपादन - रेणुका धायबर
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Pimpri chichwad, Pune police

पुढील बातम्या