मराठी बातम्या /बातम्या /मनी /मोठी बातमी! या बँकांनी बदलले मिनिमम बॅलन्स आणि व्यवहारासंदर्भातील नियम, 1 ऑगस्टपासून लागू होणार

मोठी बातमी! या बँकांनी बदलले मिनिमम बॅलन्स आणि व्यवहारासंदर्भातील नियम, 1 ऑगस्टपासून लागू होणार

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या असतांनाच रूपयाची किंमत 2 रुपयांनी वधारली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या असतांनाच रूपयाची किंमत 2 रुपयांनी वधारली आहे.

अनेक बँकांनी आर्थिक संतुलन आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी 1 ऑगस्टपासन कमीत मिनिमम बॅलन्सवर शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली, 16 जुलै : अनेक बँकांनी आर्थिक संतुलन आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी 1 ऑगस्टपासन कमीत मिनिमम बॅलन्सवर शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे 3 मोफत ट्रान्झॅक्शननंतर देखील बँकांकडून शुल्क आकारण्यात येणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra), अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank),कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) आणि आरबीएल बँक (RBL Bank) मध्ये हे शुल्क 1 तारखेपासून लागू करण्यात येणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्रच्या खातेधारकांना मेट्रो आणि शहरी क्षेत्रातील त्यांच्या खात्यामध्ये कमीतकमी 2000 रुपये शिल्लक ठेवावी लागेल. याआधी ही शिल्लक रक्कम 1500 रुपये होती. 2000 रुपयांपेक्षा कमी बॅलन्स असल्यास मेट्रो आणि शहरी भागातील 75 रुपये, निमशहरी भागात 50 रुपये आणि ग्रामीण क्षेत्रात 20 रुपये प्रति महिना एवढे शुल्क आकारण्यात येणार आहे.

(हे वाचा-Netflix ची धमाकेदार घोषणा! 17 ओरिजिनल चित्रपट-सीरिज करणार प्रदर्शित)

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एका महिन्यात 3 मोफत व्यवहारानंतर नकद जमा करणे आणि काढण्यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाईल. त्याचप्रमाणे लॉकरसाठी जमा रक्कम कमी करण्यात आली आहे मात्र लॉकरवर पेनल्टी वाढवण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे एमडी आणि सीईओ एएस राजीवयांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेकडून हे निर्णय यासाठी घेण्यात आले आहेत जेणेकरून डिजिटल व्यवहारांना चालना मिळेल आणि कोरोनाच्या काळात नागरिक बँकेत देखील कमी वेळा येतील.

अ‍ॅक्सिस बँक

या बँकेच्या खातेधारकांना आता ECS व्यवहारावर 25 रुपये प्रति ट्रान्झॅक्शनसाठी द्यावे लागतील. याआधी यासाठी कोणतेही शुल्क नव्हते. या खाजगी बँकेने 10रुपये/20 रुपये आणि 50 रुपयांच्या बंडलवर 100 रुपये प्रति बंडल हँडलिंग शुल्क सादर केले आहे.

कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँकेमध्ये बचत आणि कॉर्पोरेट खातेधारकांना डेबिट कार्ड-एटीएममधून महिन्यातून 5 वेळा पैसे काढल्यानंतरच्या प्रत्येक पैसे काढण्याच्या व्यवहारासाठी 20 रुपये आणि गैर-वित्तिय व्यवहारांसाठी 8.5 रुपये शुल्क द्यावे लागेल.

(हे वाचा-70 लाख शेतकऱ्यांना छोटी चूक पडली महागात!मिळाले नाहीत मोदी सरकारच्या योजनेचे पैसे)

जर तुमच्या खात्यामध्ये बॅलन्स कमी असल्यामुळे व्यवहार फेल झाला तरी 25 रुपये शुल्क आकारण्यात येईल. ही बँक खातेधारकांना खाते श्रेणीनुसार शिल्लक रक्कम न ठेवल्यास पेनाल्टी द्यावी लागेल.

First published:
top videos