Home /News /pune /

पिंपरीत डिलिव्हरी बॉयकडून महिलेची छेडछाड, Kiss घेण्याचा प्रयत्न

पिंपरीत डिलिव्हरी बॉयकडून महिलेची छेडछाड, Kiss घेण्याचा प्रयत्न

पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे डिलिव्हरी बॉयने महिलेची छेड काढून अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पिंपरी, 15 सप्टेंबर : राज्यभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) एका डिलिव्हरी बॉयने (Delivery boy) महिलेची छेड काढल्याचा तसेच तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. एका अज्ञात फूड डिलिव्हरी बॉयने एका महिलेची छेड काढून तिला किस करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर या डिलिव्हरी बॉयने त्या महिलेला एका हाताने मिठी मारून अश्लील शेरेबाजी केली आणि विनयभंग केला आहे. 12 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वाकडच्या सम्राट चौक या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. महिलेचा विनयभंग करणाऱ्या अज्ञात डिलिव्हरी बॉय विरोधात वाकड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र एकूणच या घटनेमुळे वाकड - हिंजवडी सारख्या आयटी परिसरांमध्ये राहणाऱ्या महिलेच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पुण्यात अल्पवयीन मुलीचं धाडस; अत्याचारातून गरोदर राहिल्यानंतर गर्भपातास नकार, दिला बाळाला जन्म पोलीस रात्री गस्तीवर असताना देखील डिलिव्हरी बॉयने तक्रारदार महिलेचा अतिशय विकृतपणे विनयभंग करण्याचा प्रयत्न केलाय. आता या अज्ञात फूड डिलिव्हरी बॉयचा शोध घेण्याचं मोठ आव्हान वाकड पोलिसांसमोर आहे. महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महिला सुरक्षित नाहीत का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Pimpri chinchawad, Pune

पुढील बातम्या