मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पेपर वाटण्यासाठी आला अन् अडीच तास अडकला लिफ्टमध्ये, मृत्यूच्या सापळ्यातून सुमितची थरारक सुटका

पेपर वाटण्यासाठी आला अन् अडीच तास अडकला लिफ्टमध्ये, मृत्यूच्या सापळ्यातून सुमितची थरारक सुटका

लिफ्टमध्ये अडकलेल्या एका पेपर वितरक तरुणाला  भिंत फोडून बाहेर काढत त्याचा जीव वाचवल्याची घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad News Update) परिसरात घडली आहे.

लिफ्टमध्ये अडकलेल्या एका पेपर वितरक तरुणाला भिंत फोडून बाहेर काढत त्याचा जीव वाचवल्याची घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad News Update) परिसरात घडली आहे.

लिफ्टमध्ये अडकलेल्या एका पेपर वितरक तरुणाला भिंत फोडून बाहेर काढत त्याचा जीव वाचवल्याची घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad News Update) परिसरात घडली आहे.

पिंपरी-चिंचवड, 14 ऑगस्ट: लिफ्टमध्ये अडकलेल्या एका पेपर वितरक तरुणाला  भिंत फोडून बाहेर काढत त्याचा जीव वाचवल्याची घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad News Update) परिसरात घडली आहे. तरुणाच्या या सुटकेचा थरार पिंपरी शहरातील च-होली परिसरातील साईनगरी सोसायटीत घडला. जवळपास 2-अडीच तास हा थरार सुरू होता. सुमित आळसे नामक 17 वर्षीय  तरुण  साई नगरी सोसायटीत सकाळी वर्तमानपत्र वितरण करत होता. त्यावेळी एका बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये प्रवेश करून सातव्या मजल्यापर्यंत तो पोहचला. मात्र, लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सातव्या मजल्यावर ती लिफ्ट न थांबता तशीच टेरेसवर जाऊन अडकली.

अचानक लिफ्ट बंद पडल्याने सुमित घाबरला . परंतु, प्रसंगाधान राखत त्याने लिफ्टमधील अलार्म बटण दाबले आणि वर्तमानपत्र विक्रेते संघाचे अध्यक्ष हेमंत तांबे यांना काॅल केला. तांबे आल्यानंतर अडकलेल्या सुमितला बाहेर काढण्यासाठी  प्रयत्न सुरू झाले मात्र सुमितला बाहेर काढम्यात यश मिळत नव्हते. शेवटी ब्रेकरने भिंत फोडून सुमितला बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि भिंत फोडून सुमितला सुखरूप बाहेर काढल्या गेलं

हे वाचा-पिंपरी चिंचवडमध्ये गुंडांचा हैदोस सुरूच; कोयता, रॉड घेऊन 8 ते 9 वाहनांची तोडफोड

सुमित च्या सुटकेचा हा थरार सुमारे 2 ते अडीच तास सुरू होता त्या दरम्यान  सोसायटीतील इतर सदस्यांनी त्याला पाणी आणि बिस्कीट ही खायला दिले. सोसायटीचे चेयरमन निलेश गीते यांनी भींत फोडून सुमितला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एकूणच हा प्रकार मृत्यूच्या जबड्यातून त्याला बाहेर काढण्यासारखा होता. कारण लिफ्ट मध्ये अडकलेल्या तरुणाला पुरेसा श्वास घेण्यासाठी हवा  मिळाली नसती तर प्रसंगी त्याच्या जीवावर बेतलं असतं

हे वाचा-पुण्यातील विद्यार्थ्यांनी केली कमाल! तयार केली ड्रायव्हरलेस गाडी; फीचर्स वाचाच

लिफ्ट अचानक बंद पडण्याचे प्रकार अलीकडे अनेक सोयायटीमध्ये घडतात, त्यामुळे नव्या नियमांप्रमाणे यापुढे लिफ्टला काच  किंवा सेफ्टी बसवणे गरजेचे आहे अशी मागणी नागरीकांडकून केली जात आहे. त्याचबरोबर लिफ्ट बसवणाऱ्या संबधित कंपन्यांवरही दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याची बाब या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे

First published:

Tags: Pimpari chinchawad