मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

पुण्यातील विद्यार्थ्यांनी केली कमाल! तयार केली ड्रायव्हरलेस गाडी; फीचर्स वाचून व्हाल थक्क

पुण्यातील विद्यार्थ्यांनी केली कमाल! तयार केली ड्रायव्हरलेस गाडी; फीचर्स वाचून व्हाल थक्क

पुण्यातील MIT कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी ड्रायव्हरलेस गाडी तयार केली आहे.

पुण्यातील MIT कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी ड्रायव्हरलेस गाडी तयार केली आहे.

पुण्यातील MIT कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी ड्रायव्हरलेस गाडी तयार केली आहे.

पुणे, 11 ऑगस्ट: वर्ल्ड क्लास 'टेसला' कारबद्दल (Tesla Car) तर तुम्ही ऐकलंच असेल. Tesla या कारमध्ये ड्रायव्हर (Tesla driverless car) नसतो हे आपल्याला माहितीच आहे. मात्र आता या गाडीला टक्कर देत पुण्यातील MIT कॉलेजमधील (MIT College Pune) काही विद्यार्थ्यांनी ड्रायव्हरलेस गाडी (Driverless vehicle) तयार केली आहे. महाविद्यालयाच्या आवारात मोठ्या धडाक्यानं या गाडीचं अनावरण करण्यात आलं आहे.

MIT कॉलेजमधील यश केसकर, सुधांशु मणेरीकर, सौरभ डमकले, शुभांग कुलकर्णी, प्रत्यक्ष पांडे आणि प्रेरणा कोळीपाका या विद्यार्थ्यांनी ही ड्रायव्हरलेस कार तयार केली आहे. अशा प्रकारचं वाहन प्रोजेक्टमधून सादर करण्याची विद्यार्थ्यांची ही पहिलीच वेळ आहे. कॉलेजमधील प्रोजेक्टचा एक भाग म्हणून या विद्यार्थ्यांनी ही भन्नाट गाडी बनवण्याचं ठरवलं आणि अशी गाडी प्रत्यक्षात बनवून दाखवली आहे.

हे वाचा - आता इंजिनिअरिंग नाही विद्यार्थ्यांना करायचंय ऑफ-बिट करिअर; या गोष्टी ठेवा लक्षात

या ड्रायव्हरलेस गाडीचं गाडीचं प्रात्यक्षिक या विद्यार्थ्यांनी करून दाखवलं आहे. मानवी चुकांमुळे अनेक अपघात होत असतात आणि हेच दररोज होणारे अपघात आणि मृत्यू कमी करण्यासाठी या गाडीचं डिझाईन करण्यात आलं आहे अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. ही गाडी तयार केल्यामुळे या विद्यार्थ्यांचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

काय आहेत या गाडीची वैशिष्ट्यं

गाडीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) अद्ययावत प्रणालींचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे मानवी चुकांमुळे होणारे अपघात आणि मृत्यू कमी करण्यास मदत होईल. ही गाडी लेव्हल थ्री ऑटोनॉमीवर (Level 3 Autonomy) आधारित असून यात बीएलडीसी मोटर्सचा (BLDS Motor) वापर करण्यात आला आहे. या वाहनाला उर्जा देण्यासाठी लिथियम आयर्न बॅटरी (LI Battery) वापरण्यात आलीय. त्यामुळे ही गाडी इलेक्ट्रिक असणार आहे आणि ऑटोमॅटिक असणार आहे.

First published: