Home /News /pune /

मास्क परिधान करण्यास सांगितलेलं झोंबलं; पुण्यात 5 जणांनी पेट्रोल पंपावरील कामगाराला केली मारहाण

मास्क परिधान करण्यास सांगितलेलं झोंबलं; पुण्यात 5 जणांनी पेट्रोल पंपावरील कामगाराला केली मारहाण

पुण्यात पेट्रोल पंपावर प्रवेश करण्यापूर्वी मास्क परिधान (Wear to mask) करण्यास सांगितल्यानं पाच युवकांनी पंपावर काम करणाऱ्या एका युवकाला बेदम (5 youth beat petrol pump staff) मारहाण केली आहे.

    पुणे, 17 मे: पेट्रोल पंपावर प्रवेश करण्यापूर्वी मास्क परिधान (Wear to mask) करण्यास सांगितल्यानं पाच युवकांनी पंपावरील काम करणाऱ्या एका युवकाला बेदम (5 youth beat petrol pump staff) मारहाण केली आहे. संबंधित घटना पुण्यातील म्हाळुंगे परिसरातील शुभम पेट्रोल पंपावर घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा (FIR Lodged) दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. घटनेची चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. पुणे मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, 14 मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास आरोपी युवक आपल्या कारमधून म्हाळुंगे परिसरातील शुभम पेट्रोल पंपावर आले. यावेळी कारमध्ये चार तरुणांसोबत एक महिलादेखील होती. कारमध्ये सर्वजण एकत्र बसले होते, शिवाय त्यांच्यापैकी कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हता. यावेळी पंपावर काम करणारा फिर्यादी नामदेव झारे यानं संबंधित तरुणांना मास्क परिधान करण्याचा सल्ला दिला. यावेळी आरोपींनी आम्ही दुसऱ्या पेट्रोल पंपावर जाऊ अशी धमकी दिली. यावेळी फिर्यादी नामदेव झारे यानं मास्क घातल्याशिवाय CNG मिळणार नाही असं सांगितलं. त्यामुळे चिडलेल्या तरुणांनी शिवीगाळ करत CNG भरण्यास सांगितलं. यामुळे चिडलेल्या आरोपींनी फिर्यादीला बांबूच्या लाकडाने मारहाण केली. एवढंच नव्हे तर पंपावरील ऑफिसचीही तोडफोड केली. याप्रकरणी फिर्यादी नामदेव झारे यानं पोलिसांत तक्रार दाखल केली असून घटनेचा तपास सुरू आहे. हे ही वाचा-VIDEO: मुंबईत टोल नाका लुटण्याचा प्रयत्न; माजी कर्मचाऱ्यानेच आखला होता प्लॅन याप्रकरणी फिर्यादी झारे यानं सांगितलं की, काही दिवसांपूर्वी आमच्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका कामगारास कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून आम्ही पंपावर येणाऱ्या प्रत्येकाला मास्क परिधान करण्यास सांगतो. मास्क परिधान करण्यास नकार दिला तर आम्ही पेट्रोल देत नाही. या व्यतिरिक्त पंपावर सोशल डिस्टन्सिंगचं योग्य पालन व्हावं यासाठी बॅरिकेड्सही लावण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणुन फिर्यादीनं आरोपींना मास्क परिधान करण्याचा सल्ला दिला होता. पण आरोपींनी फिर्यादीला बेदम मारहाण केली आहे. शिवाय पंपावरील कार्यालयाचीही तोडफोड केली आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beating retreat, Crime news, Pune

    पुढील बातम्या