मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

VIDEO: माजी कर्मचाऱ्यानेच आखला टोलनाका लुटण्याचा प्लॅन; मुंबईतील थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

VIDEO: माजी कर्मचाऱ्यानेच आखला टोलनाका लुटण्याचा प्लॅन; मुंबईतील थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Mumbai: मुंबईतील मुलुंड परिसरातील टोलनाका लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Mumbai: मुंबईतील मुलुंड परिसरातील टोलनाका लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Mumbai: मुंबईतील मुलुंड परिसरातील टोलनाका लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 16 मे: मुंबईतील टोलनाका (Mumbai Toll Plaza) लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील पूर्व उपनगर असललेल्या मुलुंड टोल नाक्यावर (Mulund Toll Plaza) तिघांच्या टोळक्याने लूट (3 youths tried to loot) करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा त्यांचा प्रयत्न अशस्वी झाला असून आता तिन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. टोलनाक्यावर लूट करण्याची ही घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुलुंड परिसरात असलेल्या टोल नाक्यावर तीन जणांच्या टोळक्याने 12 मे 2021 रोजी लूट करण्याचा प्रयत्न केला. रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारासची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. टोल नाक्यावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी या तिन्ही आरोपींना अटक करुन टोलनाका लुटण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी केला.

वाचा: VIDEO: भररस्त्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार, पुण्यातील थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तिन्ही आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या तीन आरोपींपैकी एक आरोपी हा त्याच टोलनाक्यावरील माजी कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

टोलनाक्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. या सीसीटीव्हीत दिसत आहे की, आरोपी कशाप्रकारे लूट करुन पळ काढत होते आणि त्याच दरम्यान टोलनाक्यावरील सतर्क कर्मचाऱ्यांनी आरोपींना पकडले.

First published:

Tags: Cctv, Crime, Mumbai