पुणे, 7 मे : मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला असून, दहशतीचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील काही विद्यार्थी मणिपूरमध्ये अडकले आहेत. आपली मुलं मणिपूरमध्ये अडकल्यानं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मणिपूरमध्ये अडकलेल्या मुलांच्या पालकांनी अखेर गोविंद बागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांना त्यांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर शरद पवार यांनी मणिपूर सरकारशी बोलून मुलांना सुरक्षा पुरवली असल्याचं या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितलं. शरद पवार यांच्या फोननंतर पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’ यावेळी बोलताना शरद पवार यांनी सांगितलं की, मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातून आयआयटीचं शिक्षण घेण्यासाठी मणिपूरमध्ये गेलेले काही विद्यार्थी अडकले आहेत. त्यांच्या पालकांनी आज माझी भेट घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना आणण्याबाबत मी चर्चा करतोय, मात्र संपर्क झालेला नाही. आता मी फोनद्वारे संपर्क साधणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवारांचं राजीनामा नाट्य कशासाठी? भाजपच्या गौप्यस्फोटांनं खळबळ पालकांच आरोप मणिपूरमध्ये आयाआटीचं शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातून काही विद्यार्थी गेले आहेत. मात्र मणिपूरमध्ये सुरू झालेल्या हिंसाचारानंतर ते विद्यार्थी तिथेच अडकून पडले आहेत. त्यांच्या पालकांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. इतर राज्यातील सरकारने मणिपूरमधून त्यांचे विद्यार्थी सुरक्षीत परत आणले, मात्र महाराष्ट्र सरकारकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यांनंतर शरद पवार यांनी मणिपूर सरकारला फोन करून विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्यास सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.