जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्याच्या फ्लाइटमध्ये सापडला कोरोना रुग्ण; टेक ऑफ आधी सगळ्या प्रवाशांना उतरवलं

पुण्याच्या फ्लाइटमध्ये सापडला कोरोना रुग्ण; टेक ऑफ आधी सगळ्या प्रवाशांना उतरवलं

Kochi: An Indigo flight arrives from Abu Dhabi at the Cochin International Airport, Sunday, August 11, 2019.  After being shut for more than 48 hours, the Cochin International Airport Limited (CIAL) in Nedumbaserry resumed its flight operations from 12 pm on Sunday. (PTI Photo)  (PTI8_11_2019_000158B)

Kochi: An Indigo flight arrives from Abu Dhabi at the Cochin International Airport, Sunday, August 11, 2019. After being shut for more than 48 hours, the Cochin International Airport Limited (CIAL) in Nedumbaserry resumed its flight operations from 12 pm on Sunday. (PTI Photo) (PTI8_11_2019_000158B)

corona patient in Pune bound flight: विमानात कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी मिळाली आणि एकच हल्लकल्लोळ उठला. सगळ्या प्रवाशांना खाली उतरवून तपासणी करण्यात आली.

  • -MIN READ
  • Last Updated :

    विवेक गुप्ता पुणे, 5 मार्च: दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या एका विमानात कोरोना पॉझिटिव्ह पेशंट (Corona positive in delhi Pune indigo flight) असल्याची बातमी मिळाली आणि एकच हल्लकल्लोळ उठला. सगळ्या प्रवाशांना खाली उतरवून तपासणी करण्यात आली. ही घटना गुरुवारी संध्याकाळी साडेपाचचच्या सुमारास घडली. काही काळ यामुळे संपूर्ण विमानतळावरच अस्वस्थता पसरली होती. अखेर त्या रुग्णाला हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आलं आणि विमान संपूर्ण सॅनिटाइझ करूनच टेकऑफ करण्यात आला. दिल्ली मुंबई फ्लाइट 6E 286 (Delhi-Pune Indigo Flight) मध्ये हा प्रकार झाला. महाराष्ट्रात कोरोना कहर पुन्हा सुरू झाला आहे. विदर्भाबरोबरच मुंबई आणि पुण्यातली रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढू लागली आहे. त्यातच प्रवास कसा धोक्याचा ठरू शकतो हे सांगणारी ही बातमी आली आहे. कसं लक्षात आलं? टेकऑफच्या अगदी काही वेळ आधी हा प्रकार झाल्याने गोंधळ झाला. पुण्याला जाणाऱ्या फ्लाइटचं बोर्डिंग सुरू झालं होतं. सर्व प्रवासी आपापल्या जागी बसत असतानाच हा प्रकार समोर आला. केबिन क्रूसुद्धा विमानात होता. त्या वेळी एका प्रवाशाला त्याच्या मोबाईलवर त्याने काही तास आधी केलेल्या RTPCR कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला. त्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं दिसत होतं. ही बाब लक्षात येताच त्या विमानाचं उड्डाण काही काळ स्थगित करण्यात आलं. सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर विमानाचं आतून पुन्हा एकदा निर्जंतुकीकरण करण्यात आलं आणि मगच पुण्याच्या दिशेने उड्डाण करण्यात आलं. हे वाचा - दहा दिवसात 35 जिल्ह्यांमध्ये दुप्पट झाला कोरोनाचा प्रसार, मृत्यूचा आकडाही वाढला सध्या सर्वाधिक अॅक्टिव्ह कोरोना पेशंट पुणे जिल्ह्यात आहेत. दिल्ली, केरळमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी RTPCR चाचणी अनिवार्य करण्याचा विचार होता. पण नेमक्या कुठल्या विमानतळ, रेल्वे स्थानकांवर त्याची चाचणी होते आणि कधी याबाबत एकवाक्यता नाही. मुंबई विमानतळावर महापालिकेने सर्व येणाऱ्या  प्रवाशांचं स्क्रीनिंग करण्याची सोय केलेली आहे. UK, मिडल ईस्ट, ब्राझील अशा काही देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना तर रिपोर्ट काहीही असला तरी संस्थात्मक क्वारंटाइन बंधनकारक आहे. त

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात