मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

CoronaVirus Update: दहा दिवसात 35 जिल्ह्यांमध्ये दुप्पट झाला कोरोनाचा प्रसार, मृत्यूचा आकडाही वाढला

CoronaVirus Update: दहा दिवसात 35 जिल्ह्यांमध्ये दुप्पट झाला कोरोनाचा प्रसार, मृत्यूचा आकडाही वाढला

देशातील जवळपास १८० हून अधिक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत (Coronavirus cases in India Latest Updates)पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. यातील ३४ जिल्हे असे आहेत, जिथे मागील १० दिवसात रुग्णांच्या संख्येत थेट दुप्पटीनं वाढ झाली आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली 05 मार्च : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत (Coronavirus cases in India Latest Updates)सलग वाढ होताना दिसत आहे. मागील चोवीस तासाच्या आत देशात 16 हजार 838 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यादरम्यान 13 हजार 819 लोक कोरोनातून बरे झाले आहेत, तर 113 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 1 कोटी 11 लाख 73 हजार 761 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातले 1 कोटी 8 लाख 39 हजार 894 लोक आतापर्यंत बरे झाले आहेत. तर, 1 लाख 57 हजार 584 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1  लाख 76 हजार 319 रुग्णांवर उपचार सुरू आहे. आकड्यांवर नजर टाकल्यास, देशातील जवळपास १८० हून अधिक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. यातील ३४ जिल्हे असे आहेत, जिथे मागील १० दिवसात रुग्णांच्या संख्येत थेट दुप्पटीनं वाढ झाली आहे. यात सर्वाधिक महाराष्ट्रातील ६ जिल्हे, पंजाबमधील ५, केरळ आणि गुजरातमधील प्रत्येकी ४ आणि मध्यप्रदेशमधील ३ जिल्ह्यांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं, की लसीकरणाच्या ४८ व्या दिवशी म्हणजेच गुरुवारपर्यंत देशातील १ कोटी ७७ लाख ११ हजारहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. यातील १० लाख ९३ हजार ९५४ लोकांना गुरुवारीच लसीकरणाचा पहिला डोस दिला गेला. आतापर्यंत ६८ लाख ३८ हजार ७७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर ३० लाख ८२ हजार ९४२ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. प्रमुख कोरोना प्रभावित राज्य - महाराष्ट्रात गुरुवारी ९ हजार ८५५ जणांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ६,५५९ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २१ लाख ७९ हजार १८५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील २० लाख ४३ हजार ३४९ जण बरे झाले आहेत. तर, ५२,२८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ८२,३४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केरळमध्ये गुरुवारी २,७६५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ४,०३१ जण बरे झाले आहेत, तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यातील १० लाख ६७ हजार ४५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १० लाख १६ हजार ५१५ लोक बरे झाले आहेत, ४,२४२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ४५,९९२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. गुजरातमध्ये गुरुवारी ४७५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ३५८ जण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत २ लाख ७१ हजार २४५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील २ लाख ६४ हजार १९५ जण बरे झाले आहेत. ४,४१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर २,६३८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दिल्लीत गुरुवारी कोरोनाचे नवे २४० रुग्ण आढळले आहेत. १९६ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत आतापर्यंत ६ लाख ३९ हजार ९२१ जणांना कोरोनाची लागण झाली. यातील ६ लाख २७ हजार ४२३ रूग्ण बरे झाले आहेत. तर, १०,९१४
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona hotspot, Corona updates

    पुढील बातम्या