मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यात सापडला पाकिस्तानी तरुण, 8 वर्षांपासून या भागात होता मुक्कामी, अखेर पोलिसांनी पकडले

पुण्यात सापडला पाकिस्तानी तरुण, 8 वर्षांपासून या भागात होता मुक्कामी, अखेर पोलिसांनी पकडले

pakistani young man detained

pakistani young man detained

पाकिस्तानी तरुण पुण्यात गेल्या ८ वर्षांपासून बनावट कागदपत्रे तयार करून राहत असल्याचं आढळून आलं आहे. खडक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

पुणे, 15 मार्च : पुण्यातून पाकिस्तानी तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. खडक पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुहम्मद अमान अन्सारी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसतानाही तो वास्तव्य करत असल्याचं आढळून आल्यानतंर ही कारवाई करण्यात आली आहे. मुहम्मदने खोटी कागदपत्रे वापरून भारतीय पासपोर्ट काढला आहे. त्याचा वापर करून त्याने पुणे ते दुबई असा प्रवास केला. यानंतर त्याला पासपोर्ट कायदा कलम १९५६चे कलम १२(१) (ए) (ए) अन्वये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष शाखेला मिळालेल्या माहितीवरून तपास करून हा प्रकार उघड करण्यात आलाय. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरूणाचे वडील पाकिस्तानी असून आई भारतीय असल्याच पोलिस तपासात उघड झालंय. हेरगिरी किंवा तत्सम कुठल्या कारवायांमध्ये हा तरूण आहे का याचा तपास पुणे पोलिस करत आहेत.

शिक्षकी पेशाला काळीमा, विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवून शिक्षकाचे भयानक कृत्य 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुहम्मद अन्सारी हा २०१५ पासून पुण्यात वास्तव्यास आहे. खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीत तो राहत होता. त्याने बनावट कागदपत्रे बनवून पुणे ते दुबई असा प्रवासही केला असल्याची माहिती समोर आली आहे. अवैधरित्या राहत असल्या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी मुहम्मदला ताब्यात घेतलं आहे.

मुहम्मद पुण्यात भवानी पेठेतील चुडामण तालमीजवळ वास्तव्य करत होता. २०१५ पासून आजपर्यंत बेकायदेशीरपणे कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्य करत असल्याचं आढळून आलं आहे. खोटी कागदपत्रे वापरून त्याने भारतीय पासपोर्ट Z6942263 काढला आहे. या पासपोर्टचा वापर करून परदेशात प्रवासही केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून खडक पोलीस अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Pune