जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / शिक्षकी पेशाला काळीमा, विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवून शिक्षकाचे भयानक कृत्य

शिक्षकी पेशाला काळीमा, विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवून शिक्षकाचे भयानक कृत्य

crime news

crime news

तीन दिवसांपूर्वीच गोंदिया तालुक्यातील एका शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीची छेड तसेच त्यांना अश्लील चित्रफीत दाखवीत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता अशीच घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

रवी सपाटे, गोंदिया, 15 मार्च : शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या घटनांनी गोंदिया जिल्हा हादरला आहे. आणखी एका विद्यार्थीनीचा शिक्षकाने लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. एका शिक्षकानेच विद्यार्थीनीला अश्लील चित्रफिती दाखवून लैंगिक छळ केल्याच्या या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका विद्यालयात हा प्रकार घडला आहे. दरम्यान तीन दिवसांपूर्वीच गोंदिया तालुक्यातील एका शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीची छेड तसेच त्यांना अश्लील चित्रफीत दाखवीत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच आता अर्जुनी मोरगाव तालुक्यातील घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. H3N2 चा धोका वाढला, नगरपाठोपाठ नागपुरात आणखी एका रुग्णाचा मृत्यू   याबाबत मिळालेली माहिती अशी की, विद्यार्थीनीला अश्लील चित्रफीत दाखवून लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी शिक्षकाचे नाव हेमंतकुमार गुलाराम येरणे (वय ३५) असं आहे. त्याला विशेष सत्र न्यायालयानं २८ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शिक्षक हेमंतकुमार येरणे हा पीडितेसह तिच्या मैत्रिणींच्या पाठीवरून हात फिरवायचा . कपडे ओढून आपल्या कक्षातही बोलवत असे. आरोपी शिक्षक त्याच्या मोबाईलवर अश्लील चित्रफीत दाखवायचा. पीडित विद्यार्थिनीला ‘तू सुंदर आहेस. तू मला आवडते’ असे संवाद साधायचा. पीडितेच्या मैत्रिणींना सुद्धा असेच बोलायचा. लैंगिक छळ करून त्याची लैंगिक इच्छा असल्याचे पीडितेने पोलिस ठाण्यात जबाबात म्हटले आहे. अर्जुनी मोरगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपी अटक केली आहे. शिक्षकाविरुद्ध भादंविचे कलम 354, 353 (अ) सहकलम 8, 12 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012, 3 (1) (डब्ल्यू) (2), 3(2) (5) अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime
  • First Published :
जाहिरात
जाहिरात