पुणे, 10 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्या दिल्लीतील भेटीमुळे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. 'आमची मैत्री जंगलातल्या वाघाची आहे, पिंजऱ्यातल्या नाही' असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना दिलं.
पुण्यात एका कार्यक्रमात बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी 'वाघाशी मैत्री करायला तयार आहोत' असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर वाघाची शिवसेनेच्या संदर्भात जोडत अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या. संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटील 'हे गोड आहेत त्यांनी असंच कार्यकर्त्यांशी गोड गोड वागावं, गोड बोलावं आणि कुणाशी मैत्री करायची हे वाघ ठरवतो, असा टोला लगावला होता.
ज्येष्ठ नागरिकांना मिळेल मोठा फायदा, 30 जूनपर्यंत या बँका देतायंत चांगली संधी
आज पुण्यात घरोघरी लसीकरण या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी चंद्रकांत पाटील आले होते, त्यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे. 'आम्ही जंगलातल्या वाघाची मैत्री करतो पिंजऱ्यातल्या नाही. सध्याची शिवसेनेची अवस्थाही पिंजऱ्यातल्या वाघा सारखी आहे त्यामुळे त्यांच्याशी मैत्री करायची हौस नाही' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना जोरदार चिमटा काढला.
एवढंच नाही तर चंद्रकांत पाटील यांनी 'अजित पवार यांच्यावर सध्या संजय राऊत यांची सावली पडली असून त्यांनाही संजय राऊत यांचा गुण लागला आहे' असा खोचक टोलाही लगावला.
मालाड इमारत दुर्घटना: मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा
चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस असल्यामुळे शहरात अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आला आहे. पहिल्यांदाच पुण्यात चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. त्यात मोफत लसीकरणापासून ते अगदी रिक्षाचालकांना मोफत सीएनजीचे कुपन वाटण्यापर्यंत अनेक वेगवेगळे कार्यक्रम घेतले आहेत. निवडणुकांच्या तोंडावर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटील यांच्याशी जवळीक साधण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वी गिरीश बापट यांचे नेतृत्व मानणारे हे अनेक कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांच्या वळचणीला गेले. पुणे महापालिका निवडणुकीच्या नियोजनात गिरीश बापट यांना कुठल्याही बैठकीत सहभागी करून घेतलं जात नाही. मात्र यावर प्रश्न विचारल्यानंतर गिरीश बापट आणि आपल्या आपल्या गुप्त बैठका होतात, असं सांगत येत्या महापालिका निवडणुका या गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालीच लढणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik, Sanjay raut