औरंगाबाद, 13 नोव्हेंबर: काही दिवसांपूर्वी औरंगाबाद याठिकाणी एका राजकीय पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित बलात्कार प्रकरणातील 30 वर्षीय पीडितेला एका तरुणाने तब्बल 20 लाखांना गंडा (20 lakh fraud with rape victim) घातला आहे. आरोपी तरुणाने मदत करण्याच्या बहाण्याने आणि दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवत पीडितेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने औरंगाबादेतील जीन्सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (FIR lodged) करण्यात आली आहे.
नदीम शेख अलिमोद्दीन शेख असं गुन्हा दाखल झालेल्या 35 वर्षीय आरोपीचं नाव असून तो औरंगाबाद शहरातील टाइम्स कॉलनीतील रहिवासी आहे. गेल्या वर्षीय 30 वर्षीय पीडित तरुणीने सिडको पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणात पीडितेच्या काकांच्या ओळखीतील असलेला नदीम याने गुन्हा दाखल करण्याच्या कायदेशीर प्रक्रियेत पीडितेला मदत केली होती.
हेही वाचा- बीड हादरलं! अल्पवयीन मुलीवर 400 जणांकडून बलात्कार, पोलिसानंही केलं लैंगिक शोषण
दरम्यान, पोलीस तुझ्या घरी येऊन झाडाझडती घेतील, त्यात तुझ्या वडिलांच्या विम्याचे दहा लाख रुपये आणि बहिणीचे पैसे पोलिसांच्या हाती लागल्यास तुझ्यावर नको ते आरोप होऊ शकतात. त्यामुळे तुझ्याकडील सर्व रक्कम माझ्याकडे ठेवायला दे, त्या रकमेचा दुप्पट परतावा देतो, असं आमिष नदीमने पीडितेला दाखवलं. त्यामुळे पीडितेनंही वडिलांच्या विम्याचे दहा लाख, बहिणीचे 5 लाख आणि अन्य पाच लाख अशी एकूण 20 लाखांची रक्कम आरोपीला दिली.
हेही वाचा-Pune: अंध पतीच्या डोळ्यात फेकली धूळ; 7 महिने संसार करत लाखोंचा घातला गंडा
दरम्यान, दोघांमध्ये मैत्री वाढून प्रेमसंबंधही सुरू झाले. न्यायप्रविष्ट प्रकरणं निकाली लागल्यानंतर लग्न करू असं आमिषही आरोपीनं दाखवलं. जुलै 2021 पासून पीडितेनं आरोपीकडे आपले पैसे मागण्यास सुरुवात केली. पण आरोपीनं विविध कारणं देत पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. तसेच आरोपीनं पीडितेवर विविध आरोप करत कॅनॉट प्लेसमध्ये बोलावून तिला मारहाण केल्याचंही पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Money fraud