पुणे, 9 डिसेंबर : पुणे शहरामध्ये खाद्य भ्रमंती करताना आपल्याला विविध पदार्थांची चव तर चाखायला मिळतेच. मात्र, काही पदार्थ हे निवडक ठिकाणी चांगले मिळतात. यातला एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पांडुरंग भेळ यांचा दहीवडा होय. या ठिकाणी मिळणारा दहीवडा हा ऑइल फ्री असल्यामुळे ग्राहकांना भूरळ घालत आहे. त्यामुळे ग्राहकांची या ठिकाणी हा दहीवडा खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहिला मिळते. कधी झाली पांडुरंग भेळची सुरुवात? प्रशांत संत यांनी पांडुरंग भेळची सुरुवात 2008 ला केलेली आहे. पांडुरंग भेळ येथे पाणीपुरी, चाट, भेळ, आणि दहिवडा मिळतो. या दहीवड्याची किंमत 55 रुपये प्लेट आहे. या ठिकाणी मिळणारा दहीवडा हा ऑइल फ्री असल्यामुळे ग्राहकांना भूरळ घालतो, असं पांडुरंग भेळचे मालक प्रशांत संत सांगतात.
Pune : सँडविच आणि दाबेलीचं कॉम्बिनेशन असलेला शेवपाव खाल्लाय का? पाहा Video
कसा बनवला जातो दहीवडा? हा दहीवडा बनवायच्या आधी आम्ही पहिले दोन तास उडीद भिजत घालतो. त्यानंतर ते पीठ वाटून त्याचे वडे करतो. वडे करून झाल्यावरती त्यांना पाण्यात भिजत ठेवतो त्यामधील ऑइल काढून घेतो. पाण्यातून काढून आम्ही ताज्या बनवलेल्या दह्यामध्ये ते वडे टाकतो. त्यावर आमचा चाट मसाला, चटणी, कोथिंबीर टाकून हा दहीवडा मी ग्राहकांना देतो, असं प्रशांत संत सांगतात. पांडुरंग भेळ या ठिकाणचा दहीवडा माझा फेवरेट आहे. पुण्यामध्ये फार कमी ठिकाणी चांगले दहीवडे मिळतात आणि ते देखील उत्कृष्ट चवीचे पारंपरिक पद्धतीचा दहीवडा हा पांडुरंग भेळ मध्येच खायला मिळतो. हा दहीवडा पॉकेट फ्रेंडली असून क्वांटिटी जास्त असल्यामुळे देखील तो खायला आवडतो, असं ग्राहक नीता राजोपाध्ये यांनी सांगितले.
गुगल मॅपवरून साभार पूर्ण पत्ता पांडुरंग भेळ GR6W+W8V, अहिताग्नी राजवाडे रस्ता, सदाशिव पेठ, पुणे, महाराष्ट्र 411030