मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

चार महिन्यात आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांना नाना पटोलेंचा सणसणीत टोला

चार महिन्यात आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांना नाना पटोलेंचा सणसणीत टोला

'माजी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी इरफान नावाच्या व्यक्तीला बनावट नोटा चलनात आणण्यासाठी राज्यात आणले होते'

'माजी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी इरफान नावाच्या व्यक्तीला बनावट नोटा चलनात आणण्यासाठी राज्यात आणले होते'

Nana Patole on OBC Reservation: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना चांगलाच टोला लगावला आहे.

लोणावळा, 27 जून: ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Political Reservation) मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना चांगला टोला लगावला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना आरक्षण मिळालेच पाहिजे असं म्हणत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इतकेच नाही तर सत्ता असती तर चार महिन्यात आरक्षण मिळवून देऊ असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. यावर आता नाना पटोले यांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

विधानसभा अध्यक्ष असताना ओबीसी जनगणना करावी ठराव विधानसभागृहात आणला. वास्तविक जनगणना राष्ट्रीय पातळीवर केली जाते. केंद्रीय गृहमंत्री यांनी लोकसभेत सांगितले जनगणना नव्याने करता येणार नाही अस सांगतले. आता कोरोनामुळे जनगणना करता येत नाही. देवेंद्र फडवणीस यांचे भाषण ऐकले. सत्ता द्या आरक्षण आणून देतो असं म्हटलं होतं मग हे कोठून आरक्षण आणणार? असा सवालही नाना पटोलेंनी विचारला.

"तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो": देवेंद्र फडणवीस

ओबीसी आरक्षण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निवडणूक नको या मतावर ठाम आहे. संविधान पेक्षा जास्त कोणी समजत असेल तर चुकीच आहे. ओबीसी नेत्यांची मूठ बांधली पाहिजे, आपण सगळे एकत्रित झाले पाहिजे. आपल आपल्याला करायचे, दुसरे फायदा घेतात, बावनकुळे यांना तिकीट मिळाले नाही तर दु:ख आम्हाला होतं. त्यांनी गाडी बिघडवली आपल्याला दुरूस्त करायची आहे. ज्यांनी बिघडवले त्यानिमित्त ओबीसी एकत्रित आलो, हे शुभ संकेत आहेत, आता यापुढे सगळे एकत्रित राहायला हव असंही नाना पटोले म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, जाणीवपूर्वक ओबीसींना राजकीय आरक्षणच द्यायचं नाहीये. उठलं तर केंद्राकडे बोट दाखवतात. अरे नसेल तुमच्यात हिंमत तर आम्हाला सांगा, आम्ही जर चार महिन्यात... हो आमचं राज्य असंत... चार महिन्यात ओबीसींचा एम्पिरिकल डेटा तयार करुन जर ओबीसींचं आरक्षण पूर्ववत आणलं नाही तर पदावर देखील राहणार नाही.

इच्छा असावी लागते, या ठिकाणी इच्छाच नाहीये. ज्यावेळी हायकोर्टात विषय मांडायला हवा होता त्यावेळी हायकोर्टात तारखा घेत होता आणि मंत्री रस्त्यावर मोर्चा काढत होते. आजही पाहा एम्पेरिकल डेटा तयार करत नाहीयेत तर त्याऐवजी यांचेच कार्यक्रम, मोर्चे सुरू आहेत असंही फडणवीस म्हणाले होते.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Nana Patole