पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णालयात धक्कादायक प्रकार, नर्सिंग कर्मचारी गेले संपावर

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णालयात धक्कादायक प्रकार, नर्सिंग कर्मचारी गेले संपावर

अचानक कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिल्यामुळे सकाळपासून व्यवस्थापनाची धावपळ झाली आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 03 जुलै : मुंबई, पुण्यासह राज्यात कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य सेवा देणाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. अशात आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला आहे. त्यामुळे रुगणांचे मोठे हाल होत आहेत. अचानक कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिल्यामुळे सकाळपासून व्यवस्थापनाची धावपळ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमचा विमा उतरवा आणि सुरक्षेची साधनं पुरावा या मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याची माहिती समोर येत आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे दवाखान्याच्या संचालिका रेखा दुबे असं काही झालच नसल्याचा दावा करत होत्या. त्या म्हणाल्या की, 'हा सगळा प्रकार रात्री घडला. तोपर्यंत सगळेजणं काम करत होते. कर्मचाऱ्यांच्या या निर्णयामुळे मला मोठा धक्क बसला आहे.'

मुंबईसह या ठिकाणी पुढचे 5 दिवस हवामान खात्याचा अलर्ट, असा असेल पाऊस

'कोणतीही आरोग्यसेवा अशी कामे कशी करू शकते का? डॉक्टर आणि नर्स त्यांच्या सेवेसाठी वचनबद्ध आहेत. या संकट काळात प्रत्येक आरोग्यसेवा कर्मचारी आपल्या गरजू रूग्णांची सेवा करण्यासाठी झटत आहे. या परिस्थितीत कोणीही अमानुषपणे वागू शकत नाही.' अशी प्रतिक्रिया दुबे यांनी माध्यमांना दिली आहे.

भारतीयांनी करून दाखवलं! वाचा कशी तयार झाली Made in India कोरोना वॅक्सीन

दरम्यान, पुण्यात Covid-19 चा उद्रेक होण्याची शक्यता आहे, कारण पुण्यात चाचण्यांचं प्रमाण वाढवलं आहे. पण तूर्तास लॉकडाऊनचा कुठलाही विचार नाही, असं पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केलं. उलट लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांनी विनाकारण बेड्स अडवून ठेवू नयेत, असंही आवाहन पालिका आयुक्तांनी केलं आहे.

कोण आहे विकास दुबे ज्याने केलं DSP सह 8 पोलिसांना ठार?

पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासामध्ये तब्बल1251 रूग्णांची वाढ झाली आहे. यात पुणे मनपा क्षेत्रात 860 , पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात 282, पुणे ग्रामीण हद्दीत 64 तर कॅन्टॉनमेंट परिसरात 45 नवे रूग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवसात झालेली ही जिल्ह्यातील सर्वाधिक वाढ आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: July 3, 2020, 10:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading