जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोण आहे विकास दुबे ज्याने केलं DSP सह 8 पोलिसांना ठार?

कोण आहे विकास दुबे ज्याने केलं DSP सह 8 पोलिसांना ठार?

या धक्कादायक घटनेचा हिस्ट्रीशीटर विकास दुबे (Vikas Dubey) चा मोठा गुन्हेगारी इतिहास आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लहानपणापासून तो गुन्हेगारी विश्वास मोठा होत आला. त्याला यामध्ये त्याचं नाव मोठं करायचं आहे. त्यामुळे विश्वास दुबेने सगळ्यात आधी त्याची गँग बनवली. त्यांच्याकडून तो चोरी, दरोडे, खून असे प्रकार करू लागला.

या धक्कादायक घटनेचा हिस्ट्रीशीटर विकास दुबे (Vikas Dubey) चा मोठा गुन्हेगारी इतिहास आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लहानपणापासून तो गुन्हेगारी विश्वास मोठा होत आला. त्याला यामध्ये त्याचं नाव मोठं करायचं आहे. त्यामुळे विश्वास दुबेने सगळ्यात आधी त्याची गँग बनवली. त्यांच्याकडून तो चोरी, दरोडे, खून असे प्रकार करू लागला.

लहानपणापासून तो गुन्हेगारी विश्वास मोठा होत आला. त्याला यामध्ये त्याचं नाव मोठं करायचं आहे. त्यामुळे विश्वास दुबेने सगळ्यात आधी त्याची गँग बनवली.

  • -MIN READ
  • Last Updated :

कानपूर, 03 जून : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये थरारक घटना समोर आली आहे. कानपूर पोलिसांवर अज्ञातांनी भ्याड हल्ला करत गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये डीएसपीसह 8 पोलीस शहीद झाले आहे. या हल्ल्यात एसओ बिथूर यांच्यासह 6 पोलीस गंभीर जखमी आहेत. सर्व जखमी पोलिसांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना उपचारासाठी रीजेंसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या धक्कादायक घटनेचा हिस्ट्रीशीटर विकास दुबे (Vikas Dubey) चा मोठा गुन्हेगारी इतिहास आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लहानपणापासून तो गुन्हेगारी विश्वास मोठा होत आला. त्याला यामध्ये त्याचं नाव मोठं करायचं आहे. त्यामुळे विश्वास दुबेने सगळ्यात आधी त्याची गँग बनवली. त्यांच्याकडून तो चोरी, दरोडे, खून असे प्रकार करू लागला. 19 वर्षांपूर्वी त्याने पोलीस ठाण्यात प्रवेश करून एका राज्यमंत्र्यांची हत्या केली होती आणि त्यानंतर त्याने राजकारणात येण्याचाही प्रयत्न केला. पण ते त्याला शक्य झालं नाही. विकासला अनेक वेळा अटक करण्यात आली. एकदा लखनऊमध्ये एसटीएफनंही त्याला ताब्यात घेतलं होतं. मुंबईतल्या महिलेच्या हत्येमागचं गूढ उकललं, पोलिसांनी समोर आणलं धक्कादायक सत्य कानपूरमधल्या एका रहिवाशाने सांगितलं की, विकासने अनेक तरुणांची मोठी गँग तयार केली आहे. त्यांच्याकडून तो कानपूर ग्रामीण भागात दरोडे, चोऱ्यामाऱ्या, खून यासारखे भयंकर गुन्हे करतो. मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्य सिद्धेश्वर पांडे यांच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याला म्हणायचे ‘शिवलीचा डॉन’ खरंतर, अनेक निवडणुका आणि राज्यातील सर्व प्रमुख पक्षांशी संबंधातील अनेक नेत्यांसाठी काम त्याने मोठी कामं केली आहेत. 2001 मध्ये विकास दुबे याने भाजप सरकारमधील राज्यमंत्री संतोष शुक्ला यांना पोलीस स्टेशनमध्ये घेरलं आणि गोळ्या घालून ठार केलं. या हायप्रोफाईल हत्येनंतर तो शिवलीच्या डॉन नावाने प्रसिद्ध झाला. त्याने कोर्टात आत्मसमर्पण केलं आणि काही महिन्यांनंतर जामिनावर बाहेर आला. मोठी बातमी! गँगस्टरला पकडायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला, DSP सह 8 पोलीस शहीद मिळालेल्या माहितीनुसार, यूपीमधील अनेक जिल्ह्यांमध्ये विकास दुबे विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या 52 हून अधिक खटले सुरू आहेत. त्याला अटक करण्यात मदत करणाऱ्याला पोलिसांनी 25 हजारांच बक्षीस ठेवलं होतं. खून आणि खुनाचा प्रयत्न या प्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत होते. संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात