पुणे, 24 जुलै: मागील काही दिवसांपासून देशात इंटरनेटवर (Internet) पॉर्न किंवा सेक्स व्हिडीओ (Porn Or sex videos) पाहणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गुगलवर पॉर्न व्हिडीओ सर्च (Porn searching on Google) करण्यात पुणेकरांचा पहिला क्रमांक (Pune on top) लागला आहे. या यादीत नाशिक दुसऱ्या तर नागपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागच्या काही काळात अनेकांच्या हातात स्मार्टफोन आल्यानं पॉर्न बघणाऱ्या लोकांच्या संख्येत तब्बल चारपट वाढ झाल्याची माहिती सर्वेक्षणातून (Survey) समोर आली आहे. यामध्ये अगदी शाळकरी मुलं-मुलींपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच गटातील लोकांचा समावेश आहे.
खरंतर, चार-पाच वर्षांपूर्वी भारतात 857 वेगवेगळ्या पॉर्न वेब साइटवर बंदी घालण्यात आली होती. असं असूनही देशात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. विविध तांत्रिक पद्धतीचा वापर करत लोकं पॉर्न पाहतचं आहेत. अलीकडच्या काळात लॉकडाऊनमुळे ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली अनेक अल्पवयीन आणि किशोरवयीन मुलं-मुलींच्या हातात स्मार्टफोन आला आहे. त्यामुळे गुगलवर पॉर्न व्हिडीओ सर्च करणाऱ्यांमध्ये अशा शाळकरी मुलांचा देखील समावेश आहे. यामध्ये तरुणी आणि महिला देखील मागे राहिल्या नाहीत.
हेही वाचा-गोड बोलून साडी नेसायला देत महिलेसोबत संतापजनक कृत्य; पुण्यातील धक्कादायक प्रकार
गुगलवर पॉर्न सर्च करण्यांमध्ये पुणे शहर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर नाशिक तर तिसऱ्या क्रमांकावर नागपूर शहर आहे. युवा वर्गासह महिलांचाही पॉर्न पाहण्याकडे ओढा वाढत चालल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. यामध्ये अगदी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नोकरदार महिलांनी देखील पॉर्न वेबसाइटवर सर्फिंग केल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा-पतीचं अपहरण झाल्याच्या संशयाने पोलिसात केली तक्रार; धक्कादायक रॅकेटचा खुलासा
विशेष म्हणजे, पॉर्न वेब साईटवर विविध जाहिराती दाखवून अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. लोकांना न्युड फोटो किंवा व्हिडीओ पाठवण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. यानंतर अज्ञात आरोपीकडून संबंधित अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितली जाते. आतापर्यंत देशात अशा प्रकारे अनेकांना सेक्सटॉर्शनचा शिकार बनवण्यात आलं आहे. बदनामीच्या भीतीनं अनेकजण गुन्हेगारांच्या दबावाला बळी पडत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Porn sites, Pune