जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पतीचं अपहरण झाल्याच्या संशयाने पोलिसात केली तक्रार; 10 दिवसांनंतर धक्कादायक रॅकेटचा खुलासा

पतीचं अपहरण झाल्याच्या संशयाने पोलिसात केली तक्रार; 10 दिवसांनंतर धक्कादायक रॅकेटचा खुलासा

पतीचं अपहरण झाल्याच्या संशयाने पोलिसात केली तक्रार; 10 दिवसांनंतर धक्कादायक रॅकेटचा खुलासा

पतीचं अपहरण झालं असावं या संशयाने पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली, मात्र 10 दिवसांनंतर पतीचा प्रताप पाहून तिला धक्काच बसला.

  • -MIN READ
  • Last Updated :

इंदूर, 23 जुलै : गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता असलेला हेमंत जैन अखेर महेश्वर येथील इंदूरच्या लासुडिया पोलीस ठाणे हद्दीतून सापडला आहे. 14 जुलै रोजी हेमंत जैन बेपत्ता झाला होता. त्याच्या पत्नीने यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. इतक्या दिवसांनंतर पती सापडल्याचे पोलिसांनी फोन करून त्याच्या पत्नीला कळवले होते. मात्र यानंतर आनंद होण्याऐवजी पत्नीला पतीविषयी धक्कादायक माहिती कळाली. त्यानंतर तिच्या आनंदावर विरजणच पडलं. काय आहे नेमका प्रकार ड्रग सप्लाय (Drugs Supply) आणि आणि मानवी तस्करी (human traffiking) प्रकरणात तुरुंगात असणारे सागर जैन यांचे बंधू हेमंत जैन 14 जुलै रोजी बेपत्ता झाले होते. यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही लोक हेमंतला बोलेरोमध्ये घेऊन जाताना दिसले. तब्बल 10 दिवसांनंतर हेमंत जैन सापडल्याचे त्याच्या पत्नीला फोन करून कळविण्यात आलं. पोलिसांनी 130 ग्रॅम ड्रग्ज प्रकरणात हेमंत जैन याला अटक केली होती. यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले. याशिवाय कोर्टाकडून एक दिवसाचा रिमांडही मागितला. ड्रग्ज सप्लाय आणि मानवी तस्करीसारख्या गंभीर प्रकरणात तुरूंगात बंद हाय प्रोफाइल दलाल सागर जैन आणि कपिल जैन यांचा धाकटा भाऊ हेमंत रहस्यमयपणे बेपत्ता झाला होता. त्याची पत्नी नीतू हिने पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पत्नी नीतू हिने पोलिसांना सांगितले की, संध्याकाळी सातच्या सुमारास ते आपल्या मुलीचे दूध घेण्यासाठी बाहेर गेले होते. अनेक तासांनंतरही ते परत आले नाही. तेव्हा नीतूने त्याला फोन केला, तो बंद असल्याचे आढळले. हे ही वाचा- पुण्यातील घटनेची पुनरावृत्ती; काजलच्या आत्महत्येनंतर देवेंद्रचा मृतदेह आढळला सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. यात दिसलं की, कॉलनीतच दुधाची तीन दुकाने असताना हेमंत स्कूटरवरून बाहेर जाताना दिसला. यामुळे संशय निर्माण झाला आणि नीतू देवास नाक्यापर्यंत त्याचा शोध घेण्यासाठी गेली. त्यानंतर दारूच्या दुकानाबाहेर चौकशी केली असता एका महिलेने सांगितले की आपण हेमंतला पाहिले आहे. तो रस्त्याने धावत जात होता. पांढऱ्या रंगाच्या बोलेरो जीपमधून आलेले तरुण त्याचा पाठलाग करत होते. त्यांनी हेमंतला पकडले आणि त्याला एका जीपमध्ये बसवून घेऊन गेले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात