Home /News /pune /

पुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक

पुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक

Corona Cases in Pune: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत पुण्यात उपचाराधीन कोरोना रुग्णांच्या (patients undergoing treatment) संख्येनं उच्चांक गाठला होता. हा आकडा 54 हजारांच्या पार गेला होता. पण आता या संख्येत प्रचंड घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 27 जुलै: मागील दीड वर्षाच्या कालावधीत कोरोना विषाणूनं (Corona Virus) भारताला संसर्गाच्या दोन लाटेचा (Corona virus waves) जबरदस्त तडाखा दिला आहे. दरम्यानच्या काळात देशातील लाखो जणांनी आपले प्राण गमावले (Corona deaths) आहेत. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत तर भारताची परिस्थिती खूपच बिकट झाली होती. वैद्यकीय सुविधांच्या कमतरतेमुळे अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या माणसांना डोळ्यादेखत जीव सोडताना पाहिलं होतं. दुसऱ्या लाटेत पुण्यातील (Pune) उपचाराधीन कोरोना रुग्णांच्या (patients undergoing treatment) संख्येनं उच्चांक गाठला होता. हा आकडा 54 हजारांच्या पार गेला होता. पण आता या संख्येत प्रचंड घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या पहिल्यांदाच एक हजारांच्या आत आली आहे. सध्या पुणे शहरात फक्त 916 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा आकडा मागील 9 महिन्यांतील सर्वात कमी आहे. 3 नोव्हेंबर 2020 रोजी हा आकडा 880 इतका होता. उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाल्यानं पुण्यातील आरोग्य व्यवस्थेवरील बराच ताण कमी झाला आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतून शहर पुर्णपणे सावरत असल्याचं हे चित्र आहे. हेही वाचा-40 लाख हून अधिक लहान मुलं झाली कोरोना बाधित; अमेरिकेतून आले हे धक्कादायक आकडे पुणे शहरात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारांच्या आसपास आहे. पण यातील 1 हजार 726 जणांना कोरोना विषाणूची सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे त्यांना घरीच विलगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तर अन्य 916 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेही वाचा-कोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी 45 लाख लोकसंख्या असणाऱ्या पुणे शहरात आतापर्यंत एकूण 4 लाख 85 हजार 855 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. म्हणजे शहरातील जवळपास 10 टक्क्याहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची बाधा होऊन गेली आहे. यातील 4 लाख 74 हजार 477 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर पुण्यात आतापर्यंत 8 हजार 736 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण पुण्यात 9 मार्च 2020 रोजी आढळला होता. त्यानंतर डिसेंबरपर्यंत शहराची स्थिती खूपच बिकट झाली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona patient, Pune

    पुढील बातम्या