अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (AAP) आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशनच्या अहवालानुसार 15 जुलैपर्यंत सुमारे 40.09 लाख मुलांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांत या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
या अहवालानुसार गेल्या आठवड्यात 23,500 हून अधिक लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत लहान मुलांची कोरोना बाधित होण्याची संख्या 14.2 टक्के एवढी आहे.
रुग्णालयात भरती केलेल्या रुग्णांमध्ये 1.3 ते 3.6 टक्के रुग्ण लहान मुलं आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे झालेल्या लहान मुलांचा मृत्युदर 0 ते 0.26 टक्के एवढा आहे.
कोरोना विषाणूमुळे लाखो लहान मुलं अनाथ झाले आहेत. एका वृत्तानुसार, आत्तापर्यंत जगातील 21 देशांमध्ये 15.62 लाख मुलांनी आपले आई किंवा वडील किंवा दोघांनाही गमावले आहेत. यापैकी 1,16,263 मुले ही भारतातील आहेत.