मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यातील उरुळी, फुरसुंगी कचरा डेपोचा प्रश्न; NGTचा पुणे महानगरपालिकेला दणका

पुण्यातील उरुळी, फुरसुंगी कचरा डेपोचा प्रश्न; NGTचा पुणे महानगरपालिकेला दणका

NGT directs PMC to deposit Rs 2 crores and restore environment: पुण्यातील कचरा डेपो प्रश्नावरुन एनजीटीने पुणे मनपाला दणका दिला आहे.

NGT directs PMC to deposit Rs 2 crores and restore environment: पुण्यातील कचरा डेपो प्रश्नावरुन एनजीटीने पुणे मनपाला दणका दिला आहे.

NGT directs PMC to deposit Rs 2 crores and restore environment: पुण्यातील कचरा डेपो प्रश्नावरुन एनजीटीने पुणे मनपाला दणका दिला आहे.

पुणे, 24 जून: राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (National Green Tribunal) पुणे महानगरपालिकेला (Pune Municipal Corporation) चांगलाच दणका दिला आहे. पुण्यातील उरुळी देवाची (Uruli Devachi) आणि फुरसुंगी (Fursungi) येथील कचरा डेपोतील (Garbage depot) कचऱ्यावर प्रक्रिया न केल्याने एनजीटीने पुणे मनपाला दणका दिला आहे. पर्यावरणाची हानी करणे आणि कचऱ्यावर प्रक्रिया न केल्याने एनजीटीने पुणे महानगरपालिकेला 2 कोटी रुपये बँक गॅरंटी म्हणून भरण्याचे आदेश दिले आहेत.

एनजीटीने म्हटले की, या दोन कोटी रुपयांचा उपयोग पर्यावरणाची झालेली हानी भरून काढण्यासाठी करण्यात येईल. एनजीटीचे न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले, जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया न करतता कायद्याचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी पीएमसी जबाबदार आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियम 2016चे पालन करणे आवश्यक आहे. त्यासाठी मार्गदर्शक तत्वे सुद्धा जाहीर कऱण्यात आले आहेत असंही एनजीटीने म्हटलं आहे.

नागपूर हत्या-आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; आलोक YouTube वर पहायचा 'ते' VIDEO

एनजीटीच्या खंडपीठाने सांगितले की, नियम 22 नुसार अंमलबजावीसाठी पाच वर्षांची मुदत दिली होती. ही मुदत एप्रिल 2021 मध्ये समाप्त झाली. कचरा डेपोतील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची आणि व्हिलेवाट झाली नाही. त्यामुळे पीएमसीने या नियमांचे पानल करण्याची हमी म्हणून दोन कोटी रुपयांची बँक गॅरंटी द्यावी.

पुण्यातील उरुळी देवाची, फुरसुंगी येथील कचरा डेपोमुळे नागरिकांना त्रास होतो. या प्रकरणावरुन स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलनही केलं आहे. इतकेच नाही तर नागरिकांनी या प्रकरणी न्यायालयातही धाव घेतली आहे.

First published:

Tags: Pune