नागपूर हत्या-आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; आलोक YouTube वर पहायचा 'ते' VIDEO

नागपूर हत्या-आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; आलोक YouTube वर पहायचा 'ते' VIDEO

Nagpur Murder and Suicide: नागपूर येथील पाच जणांची हत्या करुन आत्महत्या केल्याच्या प्रकरणात आता नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे.

  • Share this:

नागपूर, 24 जून: नागपुरात तीन दिवसांपूर्वी पाच जणांची हत्या (5 people murder) करुन आरोपीने आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून आरोपीने हे कृत्य का केले? याचा पोलीस तपास घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर (Shocking information revels police inquiry) आली आहे.

YouTube वर पहायचा सेक्स व्हिडीओ

आरोपी अलोक माटूळकर या युट्यूबवर लैंगिक संबंध म्हणजेच सेक्सच्या संदर्भातील व्हिडीओज पहायचा. सेक्सची विकृती असल्याने वारंवार सेक्सचे व्हिडीओ पहात होता अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

महिला वशीकरणाचे व्हिडीओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अलोक माटूळकर हा दररोज YouTube वर महिला वशीकरणाच्या संदर्भात व्हिडीओज पहायचा. महिला वशीकरणाच्या संदर्भातील विद्या शिकण्यासाठी प्रयत्न करत होता. जेणेकरुन महिलांचा उपभोग घेण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

नागपूर हादरलं, एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या

Online मागवला होता चाकू 

पोलीस तपासात अशी ही माहिती समोर आली आहे की, आरोपी अलोक याने घटनेच्या दोन दिवसांपूर्वी ऑनलाईन चाकू मागवला होता. आपल्या मुलीच्या नावावर हा चाकू मागवला होता.

काय घडलं होतं 21 जून रोजी?

नागपूर तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अलोक माटूळकर याने सर्वप्रथम आपली सासू लक्ष्मी बोबडे आणि मेव्हणी अनिशा बोबडेची हत्या केली. त्यांनतर 100 मीटर अंतरावर असलेल्या स्वतःच्या राहत्या घरी आला. तेथे त्याने आपली पत्नी विजया, 14 वर्षाची मुलगी परी यांचे हातपाय बांधले आणि गळा आवरुन हत्या केली. तर 12 वर्षाचा मुलगा साहिल यांची उशीने नाक दाबून हत्या केली. त्यानंतर स्वत: देखील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती.

Published by: Sunil Desale
First published: June 24, 2021, 7:09 PM IST

ताज्या बातम्या