जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात आजपासून नवीन नियामवली, काय सुरू, काय राहणार बंद?

पुण्यात आजपासून नवीन नियामवली, काय सुरू, काय राहणार बंद?

पुण्यात आजपासून नवीन नियामवली, काय सुरू, काय राहणार बंद?

नव्या नियमावलीनुसार, सर्व प्रकारची दुकाने आता सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत खुली राहतील.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 14 जून: पुण्यात (pune Corona cases) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे निर्बंध हटवण्यात आले आहे. आजपासून पुणेकरांना आणखी मोकळा श्वास घेता येणार आहे. पुण्यात (Pune unlock) आजपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहे तर हॉटेल्स, बार आणि रेस्टरंट रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहणार आहे. पुण्यात कोरोनाचा संसर्ग दर 5 टक्कांपेक्षा कमी आल्याने आणि ऑक्सिजन बेडसची संख्या पुरेशी असल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. नव्या नियमावलीनुसार, सर्व प्रकारची दुकाने आता सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत खुली राहतील. हॉटेल्स सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत सुरू राहतील आणि पार्सल रात्री 11 पर्यंत सुरू असेल. शाळेत असताना सुशांत दिसायचा असा; पाहा अभिनेत्याचे Unseen Photos मॉल्स, थिएटर्स, नाट्यगृह पन्नास टक्के क्षमतेनं आजपासून खुली राहणार आहेत. तसंच इतर दुकांनाच्या वेळेतही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हॉटेल्स बार, रेस्टारंट रात्री 10 पर्यंत खुली राहणार आहेत पण पन्नास टक्के क्षमतेनं परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच वाचनालयं, क्लासेस देखील सुरू होणार आहेत. उद्याने आणि स्पोर्ट्स देखील दोन वेळा खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने शनिवारी ,रविवारी  मात्र बंद राहणार आहे. अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने आणि हॉटेल्सच्या या विकेंड लॉकडाऊन बाबत पुढील शुक्रवारी 18 जून रोजी आढावा घेतला जाणार आहे, त्यानंतर पुढील सूचना दिली जाईल. मात्र, शहरात संचारबंदी रात्री 10 पासून सुरू होईल त्याचबरोबर, शहरातील उद्याने सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत खुली राहणार आहे.  Outdoor स्पोर्ट्स, क्रीडांगणे देखील सकाळी 5 ते 9 संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत खुली राहणार आहे.  तसंच अभ्यासिका, वाचनालये 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी 7 पर्यंत सुरू राहणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. हनीमूनला जाताच पतीचं सत्य आलं समोर, आता पत्नीचे कपडे अन् दागिने घालून बनणार नवरी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी निर्बंध घालून देण्यात आले आहे. 50 लोकांच्या उपस्थितीत 7 वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित करायला परवानगी मिळाली आहे. तसंच  लेव्हल 5 असलेल्या ठिकाणी जायचं तर ई-पास आवश्यक असणार आहे. शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरू झाली आहे. खाजगी कार्यालयं मात्र 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात