मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

सावधान! पुण्यात हॅकिंगचा नवीन पॅटर्न; आयटी क्षेत्रातील लोकांना बनवलं जातंय टार्गेट

सावधान! पुण्यात हॅकिंगचा नवीन पॅटर्न; आयटी क्षेत्रातील लोकांना बनवलं जातंय टार्गेट

रिमोट कंट्रोल app मालवेअर अ‍ॅप नसतात, परंतु याचा चुकीचा वापर झाल्यास, या अ‍ॅपद्वारे चुकीच्या व्यक्तीकडे फोनचा अ‍ॅक्सेस गेल्यास ते अतिशय धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे युजरला मोठं नुकसान होऊ शकतं.

रिमोट कंट्रोल app मालवेअर अ‍ॅप नसतात, परंतु याचा चुकीचा वापर झाल्यास, या अ‍ॅपद्वारे चुकीच्या व्यक्तीकडे फोनचा अ‍ॅक्सेस गेल्यास ते अतिशय धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे युजरला मोठं नुकसान होऊ शकतं.

Cyber Crime in Pune: पुण्यात सध्या सायबर क्राइमचा एक नवीन पॅटर्न समोर आला आहे. सायबर चोरटे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना टार्गेट करत आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 20 जुलै: मागील दीड वर्षांपासून भारतासह जगभर कोरोना विषाणूनं थैमान (Corona pandemic) घातलं आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात (IT Sector) काम करणाऱ्या बहुतांशी लोकांना कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा (Work from home) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. परिणामी जगभरातील असंख्य नागरिक घरात बसूनचं ऑफिसचं काम करत आहेत. अशावेळी ते घरातील असुरक्षित इंटरनेटचा वापर करत आहेत. दरम्यान अशा नागरिकांना हॅकिंगच्या (Hacking) जाळ्यात गुंतवणं सायबर चोरट्यांसाठी (Cyber criminal) सोपं जात आहे. अशातच पुण्यातील आयटी कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा लॅपटॉप हॅक करून त्यांच्याकडून लाखों रुपयांची खंडणी मागितल्याच्या घटना उघडकीस येत आहेत.

मागील दोन महिन्यांत अशाप्रकारच्या चार घटनांची नोंद झाली आहे. आरोपींनी इमेलद्वारे लिंक पाठवून संबंधित अधिकाऱ्यांच्या लॅपटॉपवर ताबा मिळवून लाखो रुपयांच्या खंडणी मागितली आहे. पण संबंधित अधिकाऱ्यांनी सायबर चोरट्याच्या धमक्यांना बळी न पडता, पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून अज्ञात सायबर चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा-आभासी चलनात गुंतवणुकीच्या बहाण्यानं फसवलं; पुण्यातील इंजिनिअरला 15लाखांचा गंडा

हॅकींगचा नवीन पॅटर्न नेमका काय आहे?

संबंधित तक्रारदारांच्या मते, अज्ञात सायबर चोरट्यानं फिर्यादीला एक ईमेलद्वारे लिंक पाठवली होती. फिर्यादीनं ही लिंक ओपन करताच, लॅपटॉपनं प्रतिसाद देणं बंद केलं. सायबर चोरट्यानं लॅपटॉपवर पूर्णपणे ताबा मिळवला होता. यामुळे लॅपटॉपमधील अति महत्त्वाचा डाटा सायबर भामट्याच्या हाती लागला होता. हा महत्त्वाचा परत हवा असेल तर, संबंधित व्यक्तीनं क्रिप्टो करन्सीच्या रुपात वीस लाख रुपये द्यावेत अशी मागणी आरोपीनं केली होती. अशीच एक घटना पुण्यातील अन्य एका आयटी अधिकाऱ्याच्या बाबतीत घडली होती.

हेही वाचा-Pune: पुस्तकं द्यायला आलेल्या विद्यार्थिनीसोबत मुख्याध्यापकाचं संतापजनक कृत्य

आरोपीनं संबंधित अधिकाऱ्याकडे 50 लाख रुपयांची मागणी केली होती. दोन्ही फिर्यादीनं आरोपींच्या दबावाला बळी न पडता पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मागील दोन महिन्यांत फक्त पुण्यातून अशा प्रकारच्या चार घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अज्ञात व्यक्तीनं सोशल मीडिया अथवा ईमेलवर अशाप्रकारे लिंक पाठवल्यास ती ओपन करू नये, असा सल्ला सायबर पोलिसांकडून देण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Cyber crime, Pune