Exclusive : भगवा रंग आणि शिवमुद्रा, राज ठाकरेंच्या मनसेसैनिकांना आता नवी ओळख!

खरंतर पक्षाचा असा हा बिल्ला छातीवर लावण्याची परंपरा आजवर फक्त शेतकरी संघटनेत होती. पण मनसेत देखील महाराष्ट्र सैनिकाचा बिल्ला अभिमानाने मिरवला जाणार आहे.

खरंतर पक्षाचा असा हा बिल्ला छातीवर लावण्याची परंपरा आजवर फक्त शेतकरी संघटनेत होती. पण मनसेत देखील महाराष्ट्र सैनिकाचा बिल्ला अभिमानाने मिरवला जाणार आहे.

  • Share this:
पुणे, 20 जुलै : पुणे महापालिका निवडणुकीच्या (pune municipal corporation election) पार्श्वभूमीवर मनसेनं मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांचे 'मनसेसैनिक ' आता नव्या नावाने ओळखले जाणार आहे.  आता यापुढे मनसेसैनिकांना 'महाराष्ट्र सैनिक' (maharashtra sainik) म्हणून ओळखले जाणार आहेत. तसा बँच (mns Badge) लावूनच राज ठाकरे यांनी या नव्या पक्षीय अभियानाची सुरूवात आज पुण्यातून केली आहे. राज ठाकरे पुण्याच्या (pune) दौऱ्यावर आहे. आज राज ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाचा पहिला बिल्ला लावून घेण्याचा पहिला मान हा मनसेचे शहराध्यक्ष आणि पक्षाचे कार्यक्रम नगरसेवक वसंतराव मोरे यांना मिळाला. स्वत: राज ठाकरे यांनी हा महाराष्ट्र सैनिकाचा पहिला बँच वसंत मोरे यांच्या छातीवर लावला, हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान असल्याचं वसंत मोरे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. 'आज दिवसभरात जवळपास 40 पक्ष पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकाचे बँच लावले. मनसेसैनिक हे महाराष्ट्र सैनिकाचे बँच मोठ्या अभिमानाने मिरवणार' असल्याचं वसंत मोरे म्हणाले. खरंतर पक्षाचा असा हा बिल्ला छातीवर लावण्याची परंपरा आजवर फक्त शेतकरी संघटनेत होती. पण मनसेत देखील महाराष्ट्र सैनिकाचा बिल्ला अभिमानाने मिरवला जाणार आहे. या भगव्या बिल्ल्यावर मध्यभागी शिवमुद्रा वरती पक्षाचं नाव आणि खालती 'महाराष्ट्र सैनिक' असं ठळक अक्षरात लिहिण्यात आलंय. राज्यभरातले 'मनसैनिक' आता यापुढे महाराष्ट्र सैनिक म्हणूनच जनतेची सेवा करतील, त्याचाच शुभारंभ म्हणून आज मनसेनं पुण्यात रेस्क्यू पथकाची स्थापना केली, आपत्ती काळात हे महाराष्ट्र सैनिक लोकांच्या मदतीला धावून जातील, असंही मनसेच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान, आगामी पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या 30 तारखेपर्यंत सर्व 8 विधानसभा मतदारसंघात नवीन शाखा अध्यक्ष नेमण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिलेत तसंच मनसेचे पुढच्या आठवड्यात गटप्रमुखांच्या नियुक्त्या पूर्ण झाल्यानंतर हेच गटप्रमुख 'राजदूत' म्हणून गल्लोगल्ली लोकांच्या भेटीगाठी घेऊन पक्षाची ध्येय धोरणं मतदारांना पटवून देण्याचं काम करणार आहेत. IND vs SL : भुवनेश्वर कुमारकडून 6 वर्ष, 3093 बॉलनंतर चूक, पाहून हैराण व्हाल थोडक्यात नाशिक पाठोपाठ आता पुण्यातही राज ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी चांगलंच लक्षं घातल्याचं बघायला मिळतंय एवढंच नाहीतर ते यापुढे महिन्यातील तीन दिवस फक्त पुणे शहरासाठी वेळ देणार असल्याचंही वसंत मोरे यांनी म्हटलंय. एकूण या तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यात मनसेचे कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह भरण्याचा प्रयत्न केलाय. आधी नवा शहराध्यक्ष नंतर नवे पक्ष कार्यालय आणि आता महिन्यातले तीन दिवस पुण्यासाठी राखून ठेवण्याचं राज ठाकरेंनी मान्य केल्याने पक्ष संघटना आळस छटकून कामाला लागली पण आता प्रश्न हा आहे की पुणेकर पुन्हा राज ठाकरेंना 'मनसे' साथ देणार का?  हेच पाहण्याचं ठरणार आहे.
Published by:sachin Salve
First published: