जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL : भुवनेश्वर कुमारकडून 6 वर्ष, 3093 बॉलनंतर चूक, पाहून हैराण व्हाल

IND vs SL : भुवनेश्वर कुमारकडून 6 वर्ष, 3093 बॉलनंतर चूक, पाहून हैराण व्हाल

IND vs SL : भुवनेश्वर कुमारकडून 6 वर्ष, 3093 बॉलनंतर चूक, पाहून हैराण व्हाल

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Sri Lanka) पहिल्या सामन्यात अपयशी ठरला होता, त्याला एकही विकेट मिळाली नव्हती, तसंच त्याने बऱ्याच रनही दिल्या होत्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलंबो, 20 जुलै : भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Sri Lanka) पहिल्या सामन्यात अपयशी ठरला होता, त्याला एकही विकेट मिळाली नव्हती, तसंच त्याने बऱ्याच रनही दिल्या होत्या. दुसऱ्या वनडेमध्ये मात्र भुवनेश्वर कुमारने जोरदार पुनरागमन केलं. पण या सामन्यात भुवनेश्वरकडून 6 वर्षांनी एक चूक झाली. क्रिकेट मॅचमध्ये बॉलर्सकडून नो बॉल (No Ball) टाकणं आपण नेहमीच पाहतो, पण दुसऱ्या वनडेमध्ये जेव्हा भुवीने नो बॉल टाकला तेव्हा अनेकांना विश्वासही बसला नाही. टीम इंडियाचा महत्त्वाचा फास्ट बॉलर असलेल्या भुवनेश्वर कुमारने 6 वर्ष आणि 3093 बॉल टाकल्यानंतर पहिला नो बॉल टाकला. याआधी ऑक्टोबर 2015 साली भुवनेश्वर कुमारने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात नो बॉल टाकला होता. भुवनेश्वर कुमारने या सामन्यात नो बॉल टाकला असला तरी त्याला 3 विकेट घेण्यात यश आलं. त्याने श्रीलंकेच्या चरित असालंका (Charith Asalanka), आविष्का फर्नांडो (Avishka Fernando) आणि दुष्मंता चमीरा (Dushmantha Chamira) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यातल्या असालंका आणि फर्नांडो यांनी अर्धशतक केलं होतं, पण भुवीने मोक्याच्या क्षणी दोघांच्या विकेट घेतल्या, त्यामुळे श्रीलंकेला मोठा स्कोअर करता आला नाही. पहिल्या वनडेमध्ये भुवीने 9 ओव्हरमध्ये 63 रन दिले होते. या सामन्यात त्याने 10 ओव्हरमध्ये 54 रन देऊन 3 विकेट घेतल्या. दुसऱ्या वनडेमध्ये श्रीलंकेला 275 रन करण्यात आल्या. भुवनेश्वरसोबतच युझवेंद्र चहलनेही 3 विकेट घेतल्या, तर दीपक चहरला 2 विकेट मिळाल्या. श्रीलंकेकडून चरित असालंकाने सर्वाधिक 65 रन आणि आविष्का फर्नांडोने 50 रन केले. भारतीय टीम शिखर धवन, पृथ्वी शॉ, इशान किशन, मनिष पांडे, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर श्रीलंकेची टीम आविष्का फर्नांडो, मिनोद भानुका, भानुका राजपक्षे, धनंजया डि सिल्वा, चरीथ असलंका, दासून शनाका, वानिंदू हसारंगा, चामीका करुणारत्ने, कसून रजिता, दुष्मंता चमीरा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात