पिंपरी-चिंचवड 07 एप्रिल : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. दररोज नवे रुग्ण सापडत असल्याने चिंता वाढलीय. अशी गंभीर परिस्थिती असताना एक दिलासा देणारी बातमी आली आहे. क्वारंटाइन केलेल्या त्या 42 डॉक्टरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून डी. वाय. पाटील रुग्णालयातील 42 डॉक्टर आणि इतर 50 कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन केलं होतं. आता 50 कर्मचाऱ्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचं YCM रुग्णलायचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात Coronavirus चा कहर दिवसेंदिवस वाढतो आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 19 नवे रुग्ण सापडले. पुण्यात आज 20 नवे रुग्ण वाढले. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार आता पुण्याचा पूर्व भाग पूर्णपणे सील करण्यात येणार आहे. पुण्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या आदेशानुसार, पूर्व पुण्याचे भवानी पेठ, नाना पेठ, कासेवाडी, गुलटेकडी, पुणे स्टेशन परिसर हे भाग पूर्णपणे सील करण्यात येणार आहेत. या परिसरात कोरोनाव्हायरसचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे कम्युनिटी स्प्रेडचा धोका लक्षात घेऊन या परिसरातली वर्दळ पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला, 3 किमीचा परिसर केला सील पण AIIMS च्या संचालकांनी पुणे आणि मुंबईसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाची साथ काही भागांमध्ये तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असल्याचं सांगितलं. आता ज्या भागात हा टप्पा गाठला आहे, तिथेच ती आटोक्यात ठेवली नाही, तर संपूर्ण शहरभर हा व्हायरस झपाट्याने पसरेल आणि मग आता न्यूयॉर्क किंवा सुरुवातीला वुहानची झाली, तशी अवस्था येईल. धक्कादायक म्हणजे गुलेरिया यांनी या थोडक्या भागांमध्ये मुंबईचं नाव घेतलं. पिंपरीत एकाने मरकजबद्दलची माहिती लपवल्यानं डॉक्टर, नर्ससह 90 जणांचा जीव धोक्यात अजूनही मुंबई-पुण्यातले नागरिक लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोटरणे पाळत नाहीत. आता त्यांनी या साथीचं गांभीर्य ओळखलं नाही, तर नंतर उशीर झालेला असेल, असाच याचा अर्थ आहे. अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये सध्या ही स्थिती आली आहे. कालच्या एका दिवसात अमेरिकेत 1500 जणांचा बळी गेला. कोरोनाग्रस्तांची संख्या अमेरिकेत लाखावर पोहोचली आहे. ती स्थिती टाळायची असेल तर आत्ताच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घरात राहायला हवं. अनावश्यक कारणासाठी बाहेर जाणं टाळायला हवं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







