जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पिंपरीत एकाने मरकजबद्दलची माहिती लपवल्यानं डॉक्टर, नर्ससह 90 जणांचा जीव धोक्यात

पिंपरीत एकाने मरकजबद्दलची माहिती लपवल्यानं डॉक्टर, नर्ससह 90 जणांचा जीव धोक्यात

कोरोनाव्हायरसमुळे साऱ्या जगाला संकटात टाकले आहे. यामुळं जगातली तब्बल 180 देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तर क्रिकेट क्षेत्रालाही याचा फटका सहन करावा लागत आहे. कोरोनामुळं क्रिकेटचे सर्व सामने रद्द करण्यात आले आहेत.

कोरोनाव्हायरसमुळे साऱ्या जगाला संकटात टाकले आहे. यामुळं जगातली तब्बल 180 देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तर क्रिकेट क्षेत्रालाही याचा फटका सहन करावा लागत आहे. कोरोनामुळं क्रिकेटचे सर्व सामने रद्द करण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निजामुद्दीन इथे जाऊन आल्याचं न सांगितल्याने 40 डॉक्टरांना कोरोनाचा धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पिंपरी-चिंचवड, 06 एप्रिल : दिल्लीत निजामुद्दीन इथे तबलिगी जमातच्या  कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका रुग्णाने आपल्या मरकजमधल्या सहभागाबद्दलची माहिती लपवल्याने तब्बल 90 जणांचा जीव धोक्यात आला आहे. त्यात या खासगी रुग्णालयातल्या डॉक्टरांचाही समावेश आहे. पिंपरीतील एका रिक्षाचालकाच्या बेजबाबदारपणामुळे तब्बल 90 लोकांचा जीव धोक्यात आला आहे. 42 डॉक्टर्स आणि इतर सुमारे 50 कर्मचाऱ्यांना  कोरोनाचा धोका असल्यानं त्यांना क्वारंटाइन कऱण्यात आलं आहे. यामध्ये 10 डॉक्टर्स आणि इतर आणि नर्स, वॉर्ड बॉयसह रुग्णालयातील इतर 50 कर्मचा-यांना अशा एकूण 90 जणांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या सर्वांचे रक्ताचे आणि थुंकीचे सँपल्स कोरोनाच्या चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचे रिपोर्टस येणं अद्याप बाकी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 40 डॉक्टरांना कोरोनाचा धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे वाचा- पोलीस मदत करत नाहीत असं वाटत असेल तर चुकीचं, गर्भवती महिलेनं शेअर केला अनुभव 31 मार्च रोजी रस्ते अपघातात जखमी झालेल्या एका रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यात काही सर्जन आणि डॉक्टरांचा समावेश आहे. त्या सगळ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या डॉक्टरांनी एक रुग्णाची सर्जरी केली होती. या सर्जरीदरम्यान रुग्णाच्या काही टेस्ट केल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या रुग्णानं आपली माहिती लपवल्यामुळे त्याचा मोठा फटका पुण्यातील डॉक्टरांना बसरणार आहे. हा रुग्ण दिल्लीतील निजामुद्दीन इथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजर होता ही माहिती त्याने डॉक्टरांपासून लपवून ठेवली होती. या रुग्णाचा एक अपघात झाला होता. त्यामध्ये इंटरनल ब्लिडिंग झाल्यामुळे त्याची सर्जरी करावी लागली होती. त्यानंतर दोन दिवस त्याला ताप येत होता. डॉक्टरांनी रुग्णाचा आईकडे या संदर्भात चौकशी केली त्यावेळी हा रुग्ण तबलिगी जमातच्या कार्यक्रमात हजर असल्याची माहिती समोर आली. हे वाचा- कोरोना राहिला बाजूला, भावानेच घेतला बहिणीचा जीव; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात