नाशिकमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला, 3 किमीचा परिसर केला सील

नाशिकमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला, 3 किमीचा परिसर केला सील

इथल्या कोणत्याही नागरिकाला घराबाहेर पडायला आणि प्रवेशास बंदी आहे. फक्त अत्यावश्यक सेवांना ही अट शिथिल करण्यात आली आहे.

  • Share this:

नाशिक 06 एप्रिल : नाशिक शहरात कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने कोठोर निर्णय घेतलाय. या रुग्णांचं निवासस्थान असलेला 3 किलोमीटरचा परिसर सील केला आहे. गोविंद नगर, मनोहर नगर हा उच्चभ्रू रहिवासी असलेला परिसर आहे. इथल्या कोणत्याही नागरिकाला घराबाहेर पडायला आणि प्रवेशास बंदी आहे. फक्त अत्यावश्यक सेवांना ही अट शिथिल करण्यात आली आहे. पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हे आदेश दिलेत.

भारतात Coronavirus ची साथ अद्याप दुसऱ्या टप्प्यात आहे. याचा अर्थ ही साथ कम्युनिटी स्प्रेडच्या स्वरूपात पसरलेली नाही. पण AIIMS च्या संचालकांनी मुंबईसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाची साथ काही भागांमध्ये तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असल्याचं सांगितलं. आता ज्या भागात हा टप्पा गाठला आहे, तिथेच ती आटोक्यात ठेवली नाही, तर संपूर्ण शहरभर हा व्हायरस झपाट्याने पसरेल आणि मग आता न्यूयॉर्क किंवा सुरुवातीला वुहानची झाली, तशी अवस्था येईल. धक्कादायक म्हणजे गुलेरिया यांनी या थोडक्या भागांमध्ये मुंबईचं नाव घेतलं.

पिंपरीत एकाने मरकजबद्दलची माहिती लपवल्यानं डॉक्टर, नर्ससह 90 जणांचा जीव धोक्यात

अजूनही मुंबई-पुण्यातले नागरिक लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोटरणे पाळत नाहीत. आता त्यांनी या साथीचं गांभीर्य ओळखलं नाही, तर नंतर उशीर झालेला असेल, असाच याचा अर्थ आहे. अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये सध्या ही स्थिती आली आहे. कालच्या एका दिवसात अमेरिकेत 1500 जणांचा बळी गेला. कोरोनाग्रस्तांची संख्या अमेरिकेत लाखावर पोहोचली आहे. ती स्थिती टाळायची असेल तर आत्ताच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घरात राहायला हवं. अनावश्यक कारणासाठी बाहेर जाणं टाळायला हवं.

First published: April 6, 2020, 11:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या