मराठी बातम्या /बातम्या /पुणे /लोकसभा पोटनिवडणुकीपूर्वीच मविआत बिघाडी? पुण्यातील काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा

लोकसभा पोटनिवडणुकीपूर्वीच मविआत बिघाडी? पुण्यातील काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला आहे. लोकसभेत भाजपला फक्त राष्ट्रवादीच हरवू शकते, असा दावा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India

पुणे, 26 मे :  पुण्यामधून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. आता या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हलचालींना सुरुवात झाली आहे.  मात्र पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वीच या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमने-सामने येण्याची शक्यता आहे.  पुणे लोकसभा मतदारसंघाची ही जागा काँग्रेसला जाणार आहे. मात्र या जागेवर आता राष्ट्रवादीकडूनही दावा करण्यात आला आहे.

पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला आहे. लोकसभेत भाजपला फक्त राष्ट्रवादीच हरवू शकते, असा दावा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. एवढचं नाही तर ही निवडणूक लढण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या या दाव्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुण्यात आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले जगताप 

गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या जागेवर फक्त राष्ट्रवादीच भाजपला हरवू शकते. राष्ट्रवादीने ही निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांकडून तयारीही सुरू आहे. मात्र याबाबत वरिष्ठ जो निर्णय घेतली तो आम्हाला मान्य असेल असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Congress, NCP, Pune, Pune news, Shiv sena