जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / 'मी आताच सांगतो, कुणीपण असू द्या, गय करणार नाही', अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा

'मी आताच सांगतो, कुणीपण असू द्या, गय करणार नाही', अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा

'मी आताच सांगतो, कुणीपण असू द्या, गय करणार नाही', अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांना मोठा इशारा दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 6 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या (Mosque Loud Speaker Sound) मुद्द्यावरुन 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यांच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार (Maharashtra Government) सतर्क झालं आहे. विशेष म्हणजे याच मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांना मोठा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या आतापर्यंत घेतलेल्या विविध भूमिकांवरुनही निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला मनसेकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरले. अजित पवार नेमकं काय म्हणाले? “कोण अल्टिमेट देतो. मी आताच सांगतो, कुणीपण असू द्या. कायदा मोडला तर गय करणार नाही, आताच सांगतो. कुणीतरी महिने, वर्ष झाले की जाग येते, सभा झाली नाही. अरे बाबा टोलचं आंदोलन घेऊन काय झालं पुढे? बांधकाम करणाऱ्या युपी-बिहारच्या लोकांना चलेजाव म्हणाले, काय झालं पुढे? वातावरण खराब करून रोजीरोटी सुटते का? आता अयोध्येला यायचं तर भाजपच्या एका नेत्याने माफी मागायला सांगितली. मला काय करायचंय, जाऊदे”, असं अजित पवार म्हणाले. ( ‘खासगीकरणाची खाज वाढायला लागलीय, कुठे-कुठे खाजवणार?’, उद्धव ठाकरेंचा खोचक वार ) “शिर्डीची काकड आरती, पंढरपूरची आरती बंद झाली. काय मिळालं? काहीतरी अल्टिमेटम देतोय. 3 तारखेनंतर बघा, अरे काय बघा? मला सांगायला काय जातंय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इकडे जा तिकडे जा हे फोडा ते फोडा. माझं सांगायला काय जातंय? खटले तुमच्यावर होतील. उद्या मी जरी काही वेडंवाकडं करायला सांगितलं तर तुम्ही नाही म्हणून सांगितलं पाहिजे. यामुळे मोठ-मोठे उद्योग यायला घाबरतात, नुकसान राज्याचं होतं. सगळ्यांना सन्मानाने राहता आलं पाहिजे, वावरता आलं पाहिजे. सुरक्षित वाटलं पाहिजे. तर व्यापारी येतील, दुकान टाकतील, धंदे येतील. तरच आर्थिक सुबत्ता येईल”, अशा शब्दांत अजित पवारांनी टीका केली. अजित पवारांनी एसटी संपावरही प्रतिक्रिया दिली. “एसटी संपातून काय मिळालं? तुमचं नुकसान झालं, राज्याचं नुकसान झालं, एसटीचं नुकसान झालं. दर महिना 300 कोटी रुपये खर्च यायचा. तो राज्यानेच उचलला ना? कारण नसताना वातावरण खराब करायचं, हे थांबवलं पाहिजे. एसटीचं प्रकरण झालं आणि एका खासदार-आमदाराच्या मनात आलं हनुमान चालीसा म्हणायची. म्हणा ना तुमच्या घरी, दुसऱ्याला कशाला त्रास? बातम्या काय आता इथे आले, गाडीत बसले तिथं पोहोचले. हा पेहराव तो पेहराव केला. चहा-पाणी दिलं नाही. परत क्लिप आलीय. कशासाठी हे करत होते?”, असा सवाल अजित पवारांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात