आनिस शेख, प्रतिनिधी
पुणे, 13 ऑक्टोबर : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज मंगळवारी पहाटे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील पनवेल हद्दीत महामार्गावर गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कंटेनरची जोरदार धडक बसल्याने अघातात पोलीस कर्मचार्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सचिन सोनवलकर असं पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते पनवेल (पळस्पे टॅप) येथे कार्यरत होते.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पनवेल हद्दीत महामार्गावर आज मंगळवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास हा विचित्र अपघात झाला. मुंबईहून पुण्याकडे जात असलेल्या मालवाहू ट्रकला (MH/ 04/4563) मागून येणाऱ्या कंटेनरने (NL/01/L6497 ) जोरदार धडक दिली. या दोन वाहनांपैकी कंटेनरची धडक दुचाकीवरून गस्त घालत असलेले पोलीस कर्मचारी सचिन सोनवलकर यांनाही लागून त्यांची दुचाकी कंटेनरखाली अडकली.
पकडलं खरं पण आता चालान कशाचं कापायचं? गाडी पाहून वाहतूक पोलिसांनाही पडला प्रश्न
दुचाकीसह सचिन सोनवलकर कंटेरनरच्या चाकाखाली सापडले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. सचिन सोनवलकर यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, गंभीररित्या इजा झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सचिन सोनवलकर यांच्या अपघातीनिधनामुळे वाहतूक पोलीस दलाने हळहळ व्यक्त केली.
भाजपला मोठा धक्का, एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक विभागाचे ठाणे डिव्हिजनचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान याच्या सह इतर अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळावर दाखल होऊन अपघातासंदर्भात माहिती घेतली. पुढील तपास महामार्ग पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.