BREAKING : भाजपला मोठा धक्का, एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

BREAKING : भाजपला मोठा धक्का, एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज आहे. अलीकडे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड न झाल्यामुळे खडसे कमालीचे दुखावले गेले होते.

  • Share this:

मुंबई, 13 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. पण, आता एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश हा निश्चित मानला जात आहे. लवकरच राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज आहे. अलीकडे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड न झाल्यामुळे खडसे कमालीचे दुखावले गेले होते. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती.

परंतु, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाबद्दल वृत फेटाळले होते.

मात्र, आता  एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे. लवकरच खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार आहे. राष्ट्रवादीत प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांच्यावर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत कोण-कोण राष्ट्रवादीमध्ये येणार याची उत्सुकता लागली आहे.  खडसे यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रामधील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये दाखल होण्याचे संकेत मिळत आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकनाथ खडसे यांच्याप्रवेशाबद्दल भाष्य केले होते. 'एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले तर आनंद होईल' असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं.  त्याचबरोबर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा, खडसे यांनी शिवसेनेत यावं असं म्हटलं होतं.

एवढंच नाहीतर, काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.  रोशन भंगाळे नावाच्या समर्थकाने एकनाथ खडसे यांना निराश होऊन फोन केला होता. खडसे आणि भंगाळे नावाच्या कार्यकर्त्यामध्ये झालेला हा संवाद व्हायरल झाला.या ऑडिओ क्लिपमध्ये एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याबद्दल वक्तव्य केले होते. पण, नंतर ही ऑडिओ क्लिप आपली नसल्याचा दावा खडसेंनी केला होता.

मुळात एकनाथ खडसे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षावर नाराज आहे. वेळोवेळी त्यांची मनधरणी करण्यात आली.  बऱ्याच वेळा खडसेंनीच भाजप सोडणार असे संकेत दिले, नंतर भाजप नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर माघार घेतली. आताही भाजपच्या नव्या कार्यकरणीची घोषणा करण्यात आली.  पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना संधी देण्यात आली. यामध्येही एकनाथ खडसे यांना डावलण्यात आले होते. त्यामुळे नाराज खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. अखेर आता एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार हे आता निश्चित झाले आहे.

Published by: sachin Salve
First published: October 13, 2020, 8:16 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading