मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अरे हे काय? प्रियांका चोप्राच्या नाकातून रक्त, ओठही फुटले

अरे हे काय? प्रियांका चोप्राच्या नाकातून रक्त, ओठही फुटले

अरे हे काय? प्रियांका चोप्राच्या नाकातून रक्त, ओठही फुटले

अरे हे काय? प्रियांका चोप्राच्या नाकातून रक्त, ओठही फुटले

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या प्रत्येक पोस्ट हा युनिक आणि क्रिएटीव्ह असतात. परंतु आज प्रियांकाने शेअर केलेला फोटो पाहून चाहते चांगलेच हैराण झालेत.

  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 18 मे - बॉलिवूड तसेच हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)  प्रियांकाने आजवर अनेक हिट सिनेमांमधून चाहत्यांची मने जिंकली आहेत. नुकतीच प्रियांका एका मुलीची आई देखील झाली आहे. मालती ( Malti Marie) असे प्रियांकाच्या मुलीचे नाव आहे. नुकतीच मालती हॉस्पिटलमधूम घरी आली आहे.  प्रियांका आणि निक जोनस (nick jonas)  यांनी लेकीसोबतचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला होता.  प्रियांका सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सध्या लेकीची काळजी घेत ती तिच्या वैयक्तिक गोष्टी देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच प्रियांकाने एक फोटो शेअर केला आहे. प्रियांकाच्या फोटो पाहण्यासाठी तिचे चाहते फार उत्साही असतात. परंतु यावेळी प्रियांकाचा फोटा पाहून तिच्या चाहत्यांना देखील चांगलाच धक्का बसला आहे.  कारण या फोटोत प्रियांका काहीशी जखमी अवस्थेत दिसत आहे. (Priyanka chopra injured photos)

प्रियांकाने गाडीत बसलेला तिचा एक सेल्फी फोटो शेअर केला आहे. ज्यात ती प्रचंड धकलेली दिसत असून तिच्या चेहऱ्याला जखमा झाल्या आहेत. तिच्या नाकातून रक्त येत आहे तर ओठ देखील फाटल्याचे दिसत आहे.  प्रियांकाने या फोटोत ब्लॅक कलरचा आऊटफिट घातला असून, फोटो शेअर करत "तुमच्याही कामाच्या ठिकाणचा दिवस कठिण होता का?" असे कॅप्शन दिलेय.

हेही वाचा -  'The Archies' साठी जबरदस्त मेहनत घेतेय शाहरुखची लेक, सुहानाचा Unseen फोटो VIRAL

प्रियांकाचा फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. परंतु फोटो खालील कॅप्शन वाचून हा फोटो प्रियांकाच्या नव्या प्रोजेक्टचा असल्याचं लक्षात येत आहे. प्रियांकाला कोणताही अपघात किंवा जखमा झाल्या नसून तिने मेकअप केला आहे.   प्रियांका चोप्राच्या आगामी कलाकृतींविषयी बोलायचं झालं तर प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी Citadel या वेब सिरीजच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.  तिने शेअर केलेला हा फोटो तिच्या याच वेब सिरिजमधील  लूक आहे. कारण फोटोच्या कॅप्शन पुढे तिने #citadel #actorslife #Adayinthelife असे हॅशटॅग्स वापरले आहेत.  प्रियांकाच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत प्रियांका तू ठिक आहे? अचानक तुला काय झालं ? असं म्हणत चिंता व्यक्त केली आहे.   तर काहींनी प्रियांकाने मेकअप केल्याचं अचूक ओळखलं आहे.

First published:

Tags: Nick jonas, Priyanka chopra