सुनिल दवंगे, प्रतिनिधी शिर्डी, 17 मे : शिर्डीच्या साईबाबांच्या (shirdi sai baba) झोळीत पुन्हा एकदा दोन कोटीच्या सोनाचे महादान (2 crore gold donation) आले आहे. साईबाबांचे सिंहासन सोन्याचे झाले होते मात्र मूर्तीच्या खालील चौथरा बाकी होता. त्यास देखिल भाविकाने सोन्याने मढवले आहे. 4 किलो सोन्याच्या पट्टीने बाबाच्या मूर्ती खालील भागाला सुवर्णमय करण्यात आले असून आता साईंबाबांचे संपुर्ण सिंहासन सोन्याचे झाले आहे. साईबाबांच्या मुर्तीला सन 2008 साली तब्बल 110 किलोच्या सोन्यापासून बनविले सिंहासन बसविले गेले होते. त्यासाठी आंध्र प्रदेशातील साईभक्त आदिनारायण रेड्डी यांनी हे सोने दान केले होते. साईच्या मुर्तीला सुवर्ण सिंहासन बसविन्यात आलं, मात्र मुर्तीच्या चौथ-याला सुवर्णाने मढवण्याचे राहिले होते. त्यासाठीची पट्टी देण्याची ईच्छा साईभक्त पार्थसार्थ रेड्डी यांनी 2016 मध्येच केली होती. मात्र त्या नंतर कोविड काळ सुरू झाल्यामुळेे ही पट्टी बसविता आली नव्हती. आता कोविडचे निर्बंध हटवल्यानंतर सर्व पुर्वपदावर आल्याने साईभक्त पार्थसार्थ रेड्डी यांनी चार किलो सोन्यापासून अत्यंत सुबक आणि आकर्षक हत्ती, मोर आणि फुलांचे असे पौराणिक नक्षीकाम केलेली ही पट्टी साईच्या मुर्तीच्या चौथऱ्याला बसवली आहे. साईबाबांनी आपले संपुर्ण जीवन अगदी साध्या पद्धतीनं व्यतीत केलंय. मात्र त्यांच्या भाविकांनी बाबांच्या दरबारी सोनाच्या दान देवून बाबांना कुबेरा सारख धनी करुन टाकलं. मंदिराला कोणी कोणी दिलं सोन - सर्वात प्रथम हैदराबाद येथील साईभक्त विजय कुमार रेड्डी यांनी साईमंदिराचा कळस सुवर्णमय केला. समाधी मंदिराला सोन्याने मढवलं गेलं. - 2008 साली साईभक्त आदिनारायण रेड्डी यांनी बाबांना 110 किलो सोनं दान देवून साईंचे सिंहासन सोन्याचं केलं. याआधी बाबांचे सिंहासन चांदीचे होते. - त्यानंतरच्या काळात समाधी मंदिरातील महिरप साठी आदिनारयण रेड्डी यांनी सोन दान देवून तो भाग देखिल सुवर्णयम केला. - समाधी मंदिराच्या साईमुर्तीच्या समोरील दर्शनी भागाचे दोन्ही खांब सोन्यानं मढवण्यात आले. हे सोनं देखील अदिनारायण रेड्डी यांनी दान दिलं होतं. - अलिकडच्या काळात मंदिर परिसरातील गणेश, शनीभगवान, महादेव मंदिरच्या कळसांना साईभक्त विजय कुमार यांनी सोन चढवलं. महत्वाचे म्हणजे लेंडीबागेतील नंदादीप देखिल यावेळी सवर्णमय केला. साई संस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी यावेळी सांगितले की, ‘4 किलो सोन्याच्या दान आले असून याची किंमत दोन कोटी रुपये आहे. यामध्ये बाबांच्या मुर्ती खालील भागाला सोन्याची पट्टी बसवण्यात आली आहे. साईभक्त पार्थसार्थ रेड्डी यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. कोविडनंतर आता त्यांनी सोन्याचे हे दान साईसंस्थान दिले आहे. त्यानुसार ही सोन्याची पट्टी बसवण्यात आली असून बाबांच्या मंगलस्नान वेळी ही काढता येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







