जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पोट भरण्यासाठी आले अन् मृत्यूने गाठले, अल्पवयीन मुलासह तिघांचा जागीच मृत्यू

पोट भरण्यासाठी आले अन् मृत्यूने गाठले, अल्पवयीन मुलासह तिघांचा जागीच मृत्यू

(पुण्यातील जुन्नरमध्ये अपघात)

(पुण्यातील जुन्नरमध्ये अपघात)

आळेफाटा इथं असलेल्या एका खाजगी बेकरीत काम करणारे मजूर बुधवारी रात्री कल्याण रोडवर एकाच दुचाकीने जेवण करण्यासाठी गेले होते.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

रायचंद शिंदे, प्रतिनिधी पुणे, 8 जून : पुण्यात एक भीषण अपघात घडला आहे. नगर-कल्याण महामार्गावर वडगाव आनंद गावच्या शिवारात चौगुले वस्तीजवळ मोटारसायकलला टेम्पो ट्रॅव्हल्स बसने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील तिघे जागीच ठार झाले. मयतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. सर्व अपघातग्रस्त परप्रांतीय असून, आळेफाटा येथे एका खाजगी बेकरीत कामानिमित्त आलेले आहेत. मयतांमध्ये एका अल्पवयीन मजुराचा समावेश आहे. अपघातातील मृतांची नावे योगेश रामकुमार (वय 21), चाहात बाबुराव (वय-17), संजीव कुमार (24) सर्व राहणार उत्तरप्रदेश अशी आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

घटनेबद्दल आळेफाटा पोलिसांनी सांगितले की, आळेफाटा इथं असलेल्या एका खाजगी बेकरीत काम करणारे मजूर बुधवारी रात्री कल्याण रोडवर एकाच दुचाकीने जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना विरुद्ध दिशेने आलेलेया (एमएच 04 एचवाय 8730) टेम्पो ट्रॅव्हल्स बसने दुचाकीवर जाणाऱ्या तिघांना जोराची धडक दिली. (Sangli News : महाराष्ट्रातलं असं गाव जिथे घराघरात आहे बुलेट, काय आहे नेमकं कारण?) दुचाकीवरील तिघांच्याही डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागेवरच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुरुवारी सकाळी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मुंबई नाशिक महामार्गावर अपघात, कंटेनरने 2 साध्वींना चिरडलं दरम्यान, मुंबई-नाशिक महामार्गावर हॉटेल ऑरेंज समोर कंटेनर च्या धडकेत दोन जैन महिला साध्वी यांचा मृत्यू झाला आहे. शहापूर तालुक्यातील कसारा बायपास येथील ऑरेज हॉटेलजवळ 2 जैन महिला साध्वी पायी जात असताना कंटेनरने पिकअप आणि ओमनी कारला धडक दिल्यानंतर पायी चालणाऱ्या महिला साध्वी यांना या वाहनांची धडक बसली. जबर धडक बसल्यामुळे साध्वींचा जागीच मृत्यू झाला. जैन साध्वी नाशिकला चातुर्मास करण्यासाठी पायी जात असताना हा अपघात झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune , pune news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात