जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli News : महाराष्ट्रातलं असं गाव जिथे घराघरात आहे बुलेट, काय आहे नेमकं कारण?

Sangli News : महाराष्ट्रातलं असं गाव जिथे घराघरात आहे बुलेट, काय आहे नेमकं कारण?

महाराष्ट्रातील बुलेटचं गाव

महाराष्ट्रातील बुलेटचं गाव

महाराष्ट्रातील हे गाव ‘बुलेटचं गाव’ म्हणून ओळखलं जातं. पाहा काय आहे कारण

  • -MIN READ Sangli,Maharashtra
  • Last Updated :

स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 8 जून : रोज नव्यानं दाखल होणाऱ्या बाईकच्या गर्दीत बुलेटची क्रेझ आजही कायम आहे. पोलीसांची गाडी म्हणून पूर्वी बुलेट ओळखली जात असे. आपल्याकडं बुलेट असावी, बुलेटस्वार होऊन सर्वांवर छाप पाडावी अशी अनेक तरुणांची इच्छा असते. तरुणांप्रमाणेच तरुणींमध्येही बुलेटची क्रेझ आता चांगलीच वाढलीय. सांगली जिल्ह्यातली एका गावाची ‘बुलेटचं गाव’ अशी ओळख आहे. ही ओळख का निर्माण झाली? या गावातील प्रत्येकाला बुलेटची क्रेझ का आहे? पाहूया स्पेशल रिपोर्ट बुलेटचं गाव सांगली जिल्ह्यात बेडग हे साधारण 27 हजार लोकसंख्येचं गाव आहे. या गावाला बुलेटचं गाव म्हणून ओळखलं जातं.  ‘या गावात पूर्वी एक मोटारसायकलही नव्हती. म्हैसाळ योजनेचं पाणी गावात आलं आणि गावाचं चित्र बदललं. गावातील शेती बहरली. गावकऱ्यांची आर्थिक सुबत्ता वाढली. बेडगमधील गावकरी हे प्रामुख्यानं ऊस आणि द्राक्ष शेती करतात. त्याचबरोबर कुक्कूटपालन हा देखील त्यांचा जोडधंदा आहे. आज ज्येष्ठ नागरिक बनलेल्या पिढीतील मंडळींनी बुलेट खरेदी केली. एका घरातील बुलेट पाहून त्यापेक्षा आधुनिक मॉडेलची बुलेट आपल्याकडं असावी, असा प्रयत्न इतरजण करू लागले. त्यामधून घरोघरी बुलेट दिसू लागल्या.

News18लोकमत
News18लोकमत

‘आधीच्या पिढीची बुलेटची आवड ही तरूणांनी देखील जपलीय. आमच्या गावातील तरूणांकडंही आधुनिक बुलेट आहेत. त्याचबरोबर आम्ही जुन्या बुलेटही जपून ठेवल्यात. कुणीही नवी बुलेट आणली की त्यापेक्षा कडक फायरिंगची बुलेट माझ्याकडं कशी असेल, असं गावकऱ्यांना वाटतं, त्यामुळे इथून पुढेही गावात बुलेटच सर्वात जास्त दिसतील,’ अशी माहिती येथील गावकरी मल्लिकार्जून कांगुने यांनी दिली. महाराष्ट्रातील ‘या’ गावात दीड तास टीव्ही, मोबाईल बंद, कारण ऐकून कराल कौतुक, Video बेडगमधील तरुणींमध्येही बुलेटची आवड आहे. ‘आम्ही कोणत्याही कामासाठी बाहेर पडताना, तसंच दुसऱ्या गावाला शिकायला जाताना बुलेटचा वापर करतो, अशी माहिती येथील शिक्षिका प्रतीक्षा चौगुले यांनी दिली. तर आमचं 30 जणांचं एकत्र कुटुंब आहे. आमच्या घरात 5 बुलेट आहेत, असं येथील अन्य एक गावकरी अमरसिंह पाटील यांनी दिली. आमच्या गावातील प्रत्येक घरात एक-दोन बुलेट आहेत, असं त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात