मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

'हापूस' खरेदी करताय मग एकदा हे वाचाच, देवगडच्या नावाने विकला जातोय कर्नाटकी आंबा

'हापूस' खरेदी करताय मग एकदा हे वाचाच, देवगडच्या नावाने विकला जातोय कर्नाटकी आंबा

एकूणच सध्या बाजारपेठेमध्ये प्रत्येक गोष्टीची डुप्लिकेट विकली जाते. आता हापूस आंब्याबाबतही तसं होऊ लागलं आहे. त्यामुळं भरपूर पैसे देऊन खरेदी करण्यापूर्वी खरंच तो खरा हापूस आहे का याची एकदा नक्की खात्री करून घ्या.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 26 एप्रिल: पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डात कर्नाटकहून येणारा आंबा कोकणचा 'देवगड हापूस' (Devgad Hapus) असल्याचं सांगत विक्री केली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी या प्रकरणी बाजारातील तीन अडत्यांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 17,700 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

(वाचा-विविध गोष्टी आणण्यासाठी जावं लागतं बाहेर; कोरोनाला घरात येण्यापासून कसं रोखाल?)

आंबा म्हणजे फळांचा राजा. आणि हापूस म्हणजे आंब्यांचा राजा असं म्हटलं जात. खरं तर बाजारामध्ये आपल्याला आंब्याचे अनेक प्रकार मिळतातच. पण हापूस आंब्याचेही आता अनेक प्रकार मिळू लागले आहेत. मात्र अस्सल कोकणातल्या हापूस आंब्याची बातक न्यारी असते. त्यामुळं या आंब्याला असलेली मागणी आणि मिळणारा दर दोन्ही जास्त असते. त्यामुळं परराज्यांतीलही विविध जातीचे आंबे 'कोकण हापूस' नावाने विकत ग्राहकांना फसवलं जाते. त्याला आळा घालण्यासाठी पणन संचालक सतीश सोनी यांनी बाजर समित्यांना कारवाई आदेश दिले आहेत.

(वाचा-रोज रात्री झोपताना हा मसाल्याचा पदार्थ खा, Immunity होईल डबल)

त्यानुसार पुण्याच्या मार्केट यार्ड या ठिकाणीदेखील सूचना देण्यात आल्या होत्या. सोमवारी बाजर समितीचे प्रशासक गरड यांनी स्वतः पाहणी केली त्यावेळी काही अडते कर्नाटकमधील आंबा 'देवगड हापूस' म्हणून विकत असल्याचा प्रकार समोर आला. देवगड हापूस आंबा नावाच्या पेटीत कर्नाटकचा आंबा भरून विकला जात होता. त्यामुळं या तीन अडत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी पहिल्यांदा पाच हजार रुपये आणि दुसऱ्यांदा दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात येत असून. त्यानंतरही असे प्रकार आढळल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा गरड यांनी दिला आहे. एकूणच सध्या बाजारपेठेमध्ये प्रत्येक गोष्टीची डुप्लिकेट विकली जाते. आता हापूस आंब्याबाबतही तसं होऊ लागलं आहे. त्यामुळं भरपूर पैसे देऊन खरेदी करण्यापूर्वी खरंच तो खरा हापूस आहे का याची एकदा नक्की खात्री करून घ्या.

First published:

Tags: Pune, Ratnagiri Hapus