जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / तुम्ही घरात आहात, मात्र विविध गोष्टी आणण्यासाठी जावं लागतं बाहेर; कोरोनाला घरात येण्यापासून कसं रोखाल?

तुम्ही घरात आहात, मात्र विविध गोष्टी आणण्यासाठी जावं लागतं बाहेर; कोरोनाला घरात येण्यापासून कसं रोखाल?

शरीरावर  बॅक्टेरियाचा हल्ला झाला तर लढण्याची ताकद कमी होते. त्यामुळे मीठ प्रमाणात खावं. जास्त प्रमाणात मीठ खाल्याने ग्लुकोकोर्टिकॉइडच्या पातळीतही वाढ होऊ शकते.

शरीरावर बॅक्टेरियाचा हल्ला झाला तर लढण्याची ताकद कमी होते. त्यामुळे मीठ प्रमाणात खावं. जास्त प्रमाणात मीठ खाल्याने ग्लुकोकोर्टिकॉइडच्या पातळीतही वाढ होऊ शकते.

अमेरिकेच्या फ्लोरिडा विद्यापीठात (Florida University)झालेल्या संशोधनानुसार कोरोनाचे 18 टक्के रुग्ण आपल्या घरातल्या व्यक्तींनाही कोरोनाचा संसर्ग देत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली 26 एप्रिल: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आतापर्यंतचे सगळे उच्चांक मोडले आहेत. त्यामुळे जास्तीतजास्त लोक घरातच कसे राहतील, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारं प्रयत्नशील आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाउनही आहे. तरीही जीवनावश्यक वस्तू, औषधं आदींसाठी कोणाला तरी घराबाहेर जावं लागतं. अमेरिकेच्या फ्लोरिडा विद्यापीठात (Florida University)झालेल्या संशोधनानुसार कोरोनाचे 18 टक्के रुग्ण आपल्या घरातल्या व्यक्तींनाही कोरोनाचा संसर्ग देत आहेत. हे प्रमाण सार्सच्या बाबतीत 7.5 टक्के, तर मर्सच्या बाबतीत 4.7 टक्के होतं. म्हणूनच अमेरिकेच्या’सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ने (CDC)एक गाइडलाइन प्रसिद्ध केली आहे. कोरोनाचा संसर्ग आपल्या घरात येऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, याबद्दलची ही गाइडलाइन नक्की उपयुक्त ठरेल.‘दैनिकभास्कर’ने याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. -होम डिलिव्हरी (Home Delivery) -डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीने मास्क, ग्लोव्हज् घातले असल्याची खात्री करावी. नसेल, तर त्याच्याकडून डिलिव्हरी घेऊ नये आणि संबंधित कंपनीकडे त्याची तक्रार करावी. -वस्तूंच्या बाहेरचं पॅकिंग किंवा खोके फाडून घराबाहेरच्या कचऱ्याच्या डब्यात टाकावं. -स्वच्छ हातांनी सामान उचलून घरात आणावं. -त्यानंतर हाथ साबणाने धुवावेत किंवा सॅनिटाइज (Sanitise)करावेत. -पेमेंट डिलिव्हरीनंतर द्यायचं असेल, तर टचलेस पर्याय अवलंबावा. हे ही वाचा- कोरोना पॉझिटीव्ह पत्नीच्या उपचारासाठी पतीनं केलं अ‍ॅम्बुलन्सचं अपहरण -दुकानातून सामान आणायचं असेल तर… (Shopping) -कापडी पिशवी घेऊन बाजारात जावं. घरी आल्यानंतर पिशवी साबणाने स्वच्छ धुवावी. -दुकानात जाताना सामानाची यादी घेऊन जावं. म्हणजे दुकानदाराशी कमीत कमी संपर्क येईल. -मास्क घालावा,हातात डिस्पोजेबल ग्लोव्ह्जही घालावेत. सोशल डिस्टन्सिंग पाळावं. ग्लोव्ह्ज घरी आल्यावर त्यांची विल्हेवाट लावावी. -ऑनलाइन पेमेंट करावं. कार्ड पेमेंट किंवा रोखीने व्यवहार शक्यतो करू नये. तसंच करायचं झाल्यास हातात ग्लोव्हज् घालूनच करावेत. -दुकानात/बाजारात कमी गर्दी असेल,अशी वेळ निवडावी. -सामान घेऊन घरी आल्यावर… (Before entering in house) -घराच्या प्रवेशद्वाराजवळ एक टेबल ठेवावं. बाहेरून आणलेलं कोणतंही सामानकाही वेळ तिथे ठेवावं. पॅकिंग केलेलं सामान असेल,तर ते तिथेच डिसइन्फेक्टकरावं. -टिन किंवा प्लास्टिक कंटेनरमध्ये खाण्याच्या वस्तू असतील,तर ते कंटेनर साबण आणि पाण्याने धुवावेत. -फळं आणि भाज्या नळाखाली स्वच्छ धुवाव्यात. -फळं,भाज्या,मटण-चिकन आदींवर साबण,ब्लीच,सॅनिटायझर आदींचा वापर करू नये. ते घातक ठरेल. -मोबाइल फोनचं कव्हर अल्कोहोल बेस सोल्युशनमध्ये कापूस भिजवून त्याच्या साह्याने साफ करावं. -बाहेर घातलेले कपडे साबणाने धुवावेत. -अत्यंत गरजेचं तेवढंच सामान खरेदी करावं. हे ही वाचा- Corona काळातील Good News : ‘देशातील रिकव्हरी रेट अमेरिकेपेक्षा चांगला’ -होम सर्व्हिस,दुरुस्ती (Home Service, Repair) -स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार कोणत्या सेवांना परवानगी आहे हे पाहावं. -घरात कोणी आजारी किंवा म्हातारी व्यक्ती असेल,तर त्यांना वेगळ्या खोलीत ठेवावं. -आपल्याला जे काही सांगायचं आहे ते त्या सेवा पुरवठादाराला फोनवरून आधीच सांगून ठेवावं, फोन/ई-मेलवरून फोटो पाठवून ठेवावेत, जेणे करून त्याला घरात जास्त वेळ थांबावं लागणार नाही. -त्याने मास्क घातलेला असलेला पाहिजे,याची किंवा अन्य गोष्टींची सूचना त्याला आधीच द्यावी. -त्याला मास्क घालूनच घरात प्रवेश द्यावा. -त्याच्याकडे नसेल किंवा असलेला चांगला नसेल,तर तीन लेयर्सचा डिस्पोजेबल मास्क (Disposable Mask)त्याला द्यावा. -घरातल्या सर्वांनीही मास्क घालावा. -सेवा पुरवठादारापासून किमान सहा फुटांचं अंतर ठेवावं. -शक्यतो टचलेस पेमेंट करावं. -रोखीने व्यवहार करावा लागल्यास सॅनिटायझरने किंवा साबणाने हात स्वच्छ करावेत. -काम पूर्ण झाल्यावर त्याचा स्पर्श झालेले सगळे पृष्ठभाग सॅनिटाइझ करावेत. -डॉक्टरांकडे जाणं, औषधखरेदी (Visit to Doctor, Medical) -डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी त्यांच्याशी ऑनलाइन,फोन किंवा ई-मेलवरून चर्चा करावी. -टेलि-मेडिसीन सुविधा उपलब्ध असल्यास तिचा वापर करावा. -तुम्हाला कोरोनाची लक्षणं दिसत असतील, तर क्लिनिकमध्ये गेल्यानंतर त्याची कल्पना लगेचच डॉक्टरांना द्या. -घरातून बाहेर पडल्यापासून पुन्हा घरात येईपर्यंत मास्क योग्य पद्धतीने कायम लावून राहा. -कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श करू नका. -चेहरा,डोळे,नाकाला स्पर्श करू नका. -सार्वजनिक वॉशरूमचा शक्यतो वापर करू नका. -सोशल डिस्टन्सिंग राखा. -शक्यतो टचलेस पेमेंट (Touchless Payment)करावं. -रोखीने व्यवहार करावा लागल्यास सॅनिटायझरने किंवा साबणाने हात स्वच्छ करावेत. -मेडिकल स्टोअर किंवा काउंटरवर गेल्यानंतर डॉक्टरांनी दिलेली सगळी औषधं एकाच वेळी खरेदी करावीत. -फर्स्ट एड बॉक्समधली औषधं,घरात नेहमी लागणारी औषधं वगैरे सगळी औषधं एकाचवेळी खरेदी करावीत,जेणेकरून पुनःपुन्हा तिथे जावं लागणार नाही. -काउंटरपासून,तसंच अन्य व्यक्तींपासून दूर राहावं. -शक्य असल्यास ऑनलाइन औषधं पुरवणाऱ्या वेबसाइट्सचा (E-Commerce Websites)वापर करावा.  कोरोनाविषाणू कार्डबोर्डवर2४ तास, काचेवर चार दिवस, कपड्यांवर तीन दिवस, तर प्लास्टिकवर तीन ते सात दिवस राहू शकतो, असं आढळलं आहे. त्या दृष्टीनेयोग्य ती काळजी घ्यावी.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात