माळशेज, 21 जुलै : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय माळशेज घाटात आला. घाटातून जात असताना अचानक दरड कोसळली पण सुदैवाने या दुर्घटनेत कारमधून प्रवास करणारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक थोडक्यात बचावले. या दुर्घटनेत ते जखमी झाले असून त्यांच्या कारसह इतर काही वाहनांचे यामध्ये नुकसान झाले आहे.
परळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक देसले सोमवारी माळशेज घाटातून जात होते. पावसाळ्याच्या दिवसात माळशेज घाटात दरड कोसळण्याची जास्त भीती असते. त्यामुळे घाटात प्रवेश करतानाच वाहनं सावकाश चालवा, अशी सूचना वाहतूक पोलिसांकडून दिली जाते. परंतु, निसर्गाच्या पुढे कुणाचा काही निभाव लागत नाही. दरवर्षी घाटात दरड कोसळल्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या.
VIDEO: बाइक घेऊन जात असतानाच कोसळली दरड, डोळ्यांसमोर होता मृत्यू पण...
अशोक देसले हे आपल्या मारुती सुझुकी कारने जात होता. घाटात पोहोचल्यावर अचानक त्यांच्या कारसमोरच एक भली मोठी दरड कोसळली. जीपच्या आकाराएवढा दगड समोर येऊन आदळला. यावेळी दरडीचा काही भाग कारवर कोसळला. यात कारच्या समोरील भागाचा पार चुराडा झाला. त्यांच्या कारसह इतर वाहनांवरही दरडीचे काही दगड कोसळले.
या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरडीचा मलबा बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, नंतर घाट सुरू करण्यात आला.
मुंबईत महिलेला तब्बल 11 लाखांना लुटले, पद्धत पाहून पोलीसही गेले चक्रावून!
पावसाळ्यात माळशेज घाट परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने अशा दुर्घटना नेहमी घडत असतात. मागील वर्षी हा घाट महिनाभर याच कारणामुळे बंद होता. यंदाच्या पावसाळ्यात दरड कोसळल्याची ही पहिलीच घटना आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.