पुणे, 10 जानेवारी : मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे. मकर संक्रांत म्हटले की सगळ्या महिला वर्गांना काळ्या रंगाच्या साड्या खरेदी करण्याचे वेध लागतात. कारण की मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे की ज्या सणांमध्ये काळ्या रंगाचा दिलखुलास पणे वापर होतो. मकर संक्रांतसाठी हा रंग महिला वर्गामध्ये साड्यांसाठी अतिशय लोकप्रिय आहे. मकर संक्रांतीनिमित्त पुण्याच्या बाजारपेठांमध्ये विविध प्रकारच्या साड्या आलेल्या आहेत. या साड्या तुम्ही 300 रुपयांपासून खरेदी करू शकता. कोणत्या प्रकारच्या आहेत साड्या? सध्या आमच्या दुकानांमध्ये कॉपर नक्षीकामाच्या साड्या आहेत. यामध्ये चंदेरी, सोनेरी या धाग्यांनी नक्षीकाम केलेल्या साड्या मिळतील. मात्र, यावर्षीचा बदलता ट्रेंड म्हणजे कॉपरच्या नक्षी कामाच्या साड्या सध्या ट्रेंडमध्ये आहेत. या ट्रेंडमध्ये खनाच्या साड्या, पैठणी, गडवाल सिल्क प्रकारच्या साड्यांमध्ये सध्या कॉपर नक्षी कामाचा ट्रेंड आलेला आहे, असं रसिक साडी सेंटरचे अमित दर्डा यांनी सांगितलं.
यासोबतच नेहमीच्या विविध साड्यांचे देखील ट्रेंड अजूनही सुरू आहेत. पैठणीमध्ये सेमी पैठणी देखील आहे. कारण की काळी साडी जास्त वेळा घातली जात नाही म्हणून सेमी पैठणी जास्त करून सध्या विकली जात आहे. यासोबतच सध्या डिझाइनर साड्यांना मागणी असून या प्युअर सिल्कच्या साड्या असून यांचे ब्लाऊज पीस साड्यांपेक्षा वेगळे डिझायनर ब्लाऊज पीस सध्या या साड्यांसोबत मिळत आहेत. या साड्याची किंमत 300 रुपयांपासून सुरु होते, असंही अमित दर्डा यांनी सांगितलं.
Video : हलव्यांच्या दागिन्यांनी खुलेल तुमचं सौंदर्य, पाहा पुण्याच्या बाजारपेठेत काय आहे खास?
मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाच्या कपड्याच्या मान साडी खरेदीसाठी आलेल्या वैशाली पाठक यांनी सांगितले की; प्रत्येक मकर संक्रांतीच्या दिवशी आम्हा स्त्रियांना काळ्या रंगाच्या साड्या नेसायला आवडतात. मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाच्या कपड्याच्या मान असतो. सध्या बाजारात विविध प्रकारच्या काळ्या साड्या आल्या आहे आणि त्या अतीशय मोहून टाकणाऱ्या आहेत.

)







