पुणे 09 जानेवारी : मकर संक्रांतिचा सण म्हटले की तिळगुळ सोबतच हलव्याच्या दागिन्यांची देखील प्रथा आहे. नवजात शिशु असो नवीन सुना असो किंवा जावई असो यांना हलव्याचे दागिने घालून सजवणे हा मोठ्या कौतुकाचा विषय असतो. गेल्या काही वर्षापासून हा ट्रेण्ड सर्वत्र जोमाने चालू आहे. मकर संक्रांतीनिमित्त पुण्याच्या बाजारपेठांमध्ये नवनवीन हलव्याचे दागिने आलेले आहेत. कोणत्या प्रकारचे आहेत दागिने? या दागिन्यांची खासियत अशी की, अतिशय बारीक आणि नाजूक कलाकुसरीने हे दागिने बनवले आहेत. अनघा हार, जानव्ही हार, श्रीकृष्ण सेट महालक्ष्मी हार, तनमनी हार, पायातली पैंजण, बाजूबंद एवढेच काय तर मोबाईलचा कवर देखील या हलव्याच्या दागिन्यांपासून बनलेला आहे. लहान बालकांना बोरन्हासाठीचे दागिने सुद्धा आमच्याकडे उपलब्ध असल्याचे शनिपारा जवळील हलव्याच्या दागिन्यांचे विक्रते प्रणव गंजीवाले यांनी सांगितले.
दागिन्यांची किंमत किती? 50 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत आमच्याकडे विविध पद्धतीचे हलव्याचे दागिने उपलब्ध आहेत. हलव्याच्या दागिन्यांना भरपूर मागणी देखील आहे. मकर संक्रांतीच्या आधीच हे हलव्याचे दागिने विकले जातात. कारण की अनेकांना हे दाग दागिने परदेशात पाठवावे लागतात असंही प्रणव गंजीवाले यांनी सांगितले.
Video : मकर संक्रांतीसाठी साडी खरेदी करायचीये? मुंबईतील हे पर्याय आहेत बेस्टबोरन्हानसाठी दागिने खरेदी माझी नात ही परदेशात असते आणि तिच्या बोरन्हानसाठी मी इथे दागिने खरेदीसाठी आलेले आहे. यामध्ये मी लहान मुलांच्या गळ्यातले हार आणि बाजूबंद असे दागिने घेतलेले आहेत, असं ग्राहक मेधा यांनी सांगितले आहे.

)







